Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना उपजिल्हा प्रमुख चौगुलेंविरोधात बलात्काराचा गुन्हा

By admin | Updated: December 18, 2014 00:51 IST

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्याविरोधात सीबीडीत राहणा-या एका तरूणीने बलात्काराची तक्रार केली आहे.

नवी मुंबई : शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्याविरोधात सीबीडीत राहणा-या एका तरूणीने बलात्काराची तक्रार केली आहे. या प्रकरणी चौगुलेंविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय चौगुले यांनी गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचे २२ वर्षीय तरूणीने तक्रारीत म्हटले असल्याचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. त्यानुसार चौगुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे उमाप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)