Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘माय मराठी’च्या संचालकावर गुन्हा

By admin | Updated: October 30, 2016 00:47 IST

तरुणीला रिपोर्टर्स हेडपदी नोकरी देण्याचे आमिष दाखवत ‘माइंडसेट’ टे्रनिंगच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोरेगावमध्ये उघडकीस आली.

मुंबई : तरुणीला रिपोर्टर्स हेडपदी नोकरी देण्याचे आमिष दाखवत ‘माइंडसेट’ टे्रनिंगच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोरेगावमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी माय मराठी चॅनेलचे संचालक आणि वंदेमातरम प्रतिष्ठानचे प्रवक्ते आभास पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.२१ वर्षीय तक्रारदार तरुणी नालासोपारा येथील नातेवाइकांकडे राहते. तक्रारीनुसार, नोकरी आणि चांगल्या पगाराचे आमिष दाखवून तिला कामावर रुजू केले. त्यानंतर पाटीलने तरुणीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाटीलविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भास्कर अकोजीराव जाधव यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी गुन्हा दाखल असल्याबाबत दुजोरा दिला. मात्र त्यांच्या अटकेबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. (प्रतिनिधी)