Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:08 IST

धमकीचाही आरोप, सायबर पोलिसांकड़ून तपास सुरुचित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोप्रकरणी गुन्हा दाखलधमकीचा काॅल आल्याचाही आरोप; सायबर ...

धमकीचाही आरोप, सायबर पोलिसांकड़ून तपास सुरु

चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोप्रकरणी गुन्हा दाखल

धमकीचा काॅल आल्याचाही आरोप; सायबर पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल, व्हिडीओबरोबरच फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी मंगळवारी सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. त्यानुसार बीकेसी येथील सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चित्रा वाघ यांचे माॅर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. भाजप नेत्यांनीही या फोटोंवर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. फोटो व्हायरल झाल्यानंतर वाघ यांनी फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली. मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी करत, मंगळवाऱी त्यांनी सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेतली.

वाघ यांनी केलेल्या तक्रारीत फोटो मॉर्फिंगबरोबरच धमकीचे कॉलही येत असल्याचे सांगितले. तसेच काही अश्लील कमेंट्सही केल्याचे, काही कॉल, व्हिडीओद्वारे जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग, जीवे मारण्याची धमकी, आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

...............................

...