Join us

तक्रारदार महिलेच्या वकिलावरही गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:07 IST

२०१८मधील विनयभंगाचे प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेच्या वकिलावरदेखील ...

२०१८मधील विनयभंगाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेच्या वकिलावरदेखील विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या वकिलाच्या नवी मुंबई येथील एपीएमसीमधील कार्यालयात २०१८ साली हा प्रकार घडला होता. या प्रकरणात वकील रमेश त्रिपाठीने अटकपूर्व जामीन घेतलेला आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या महिलेच्या वतीने वकील रमेश त्रिपाठी हे प्रकरण हाताळत आहेत. दरम्यान, त्रिपाठी यांच्यावरदेखील २०१८ मध्ये एपीएमसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्रिपाठी यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीने हा आरोप केला होता.

या तरुणीला केबिनमध्ये बोलावून त्रिपाठी यांनी लगट केल्याचा तरुणीचा आरोप होता. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल होताच त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीन घेतलेला असल्याचे एपीएमसी पोलिसांनी सांगितले.