मुंबई : भुकेमुळे सोसायटीच्या गेटमध्ये शिरू पाहणाऱ्या कुत्र्याला सुरक्षारक्षकाने आधी रॉडने मारले आणि नंतर या कुत्र्याला तसेच बांधून कचराकुंडीत फेकून दिल्याची घटना भांडुपमध्ये घडली. शवविच्छेदन अहवालात कुत्र्याला ठार मारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भांडुप पोलिसांनी या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भांडुप पश्चिमेकडील दत्तमंदिर रोड परिसरात समर्थ गार्डन सोसायटी भागात ही घटना घडली. प्राणिमित्र व स्थानिक रहिवासी ओम्कार सावंत यांनी या कुत्र्याला परळच्या पशू वैद्यकीय रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कुत्र्याची हत्या करणाऱ्या सुरक्षारक्षकावर गुन्हा
By admin | Updated: December 24, 2016 03:33 IST