Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिमरीत्या आंबे पिकवणाऱ्यांवर गुन्हा

By admin | Updated: April 14, 2015 02:32 IST

व्यायवसायिक समीकरण साधण्यासाठी बाजारात येणारे आंबे घातक रसायनांद्वारे पिकविण्यात येतात.

पूजा दामले ल्ल मुंबईव्यायवसायिक समीकरण साधण्यासाठी बाजारात येणारे आंबे घातक रसायनांद्वारे पिकविण्यात येतात. मात्र ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या ‘व्यापारी कृत्या’वर आता अन्न व औषध प्रशासन (एफडीए)ची करडी नजर असून, संबंधितांवर भा.दं.वि.च्या कलम ३२८नुसार विषप्रयोगाचे अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी सांगितले.यासंदर्भात जानेवारी महिन्यात आंबा विके्रते, पोलीस आणि एफडीए अधिकारी यांची बैठक झाली होती. त्यात कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा आरोग्यास किती हानिकारक आहे, याची माहिती सर्व संबंधितांना देण्यात आली होती. तरीही रसायनाने आंबे पिकविणाऱ्यांवर बडगा उगारण्यात येणार आहे. गेल्या १०-१२ दिवसांत आंब्यांचे २२ नमुने घेण्यात आले, पण त्यात कार्बाइडचा अंश सापडलेला नसल्याचे देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नैसर्गिकरीत्या आंबा पिकण्यासाठी २० ते २१ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आंबा लवकर तयार करण्यासाठी अनेक व्यापारी कृत्रिमरीत्या पिकवतात. कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून हे आंबे पिकवले जातात. मात्र ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक असते.यंदा कृत्रिमरीत्या पिकलेला आंबा बाजारात येऊ नये म्हणून जानेवारी महिन्यापासून एफडीएने तयारी सुरू केली आहे. जानेवारी महिन्यात आंबा विके्रते, पोलीस आणि एफडीए अधिकारी यांची एकत्रित बैठक झाली होती. यात कृत्रिम पिकवलेला आंबा आरोग्यास किती हानिकारक आहे, याची माहिती सर्व संबंधितांना देण्यात आली. स्थानिक पोलीस वाशीच्या मार्केटवर लक्ष ठेवून आहेत. यामुळे यंदा ग्राहकांना नैसर्गिकरीत्या पिकलेलाच आंबा खायला मिळेल, असेही देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेल्या १०-१२ दिवसांत आंब्यांचे २२ नमुने घेण्यात आले, पण त्यात कार्बाइडचा अंश सापडलेला नसल्याचेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले. कार्बाइड वापरल्याने आंबा पिकायला जितक्या तापमानाची आवश्यकता असते, तितके तापमान दोन ते तीन दिवसांत निर्माण होते. पण, फक्त आंब्याचा रंग बदलतो. हिरवा आंबा पिवळा दिसायला लागतो. आंबा आतून मात्र पिकत नाही. आंबे विकत घेताना ग्राहकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. आपण विकत घेत असलेले फळ कृत्रिमरीत्या तर पिकविलेले नाही ना याचा विचार ग्राहकांनी करायला हवा. त्याचप्रमाणे खात्रीशीर स्थानीच आंबे खरेदी केले पाहिजेत. केवळ रंगाकडे न पाहता प्रक्रिया व चव यांचाही विचार ग्राहकांनी केला पाहिजे. यामुळे कृत्रिमरीत्या पिकविलेल्या आंब्यांपासून होणारा संभाव्य त्रास टळेल.