मुंबई : वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या क्रिकेट सामन्यांची ५० तिकिटे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मुंबईतील प्रत्येक सदस्य क्लबला सवलतीच्या दरामध्ये देण्यात आली आहेत़ मुंबईत वर्षभरात झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय सामन्यांची तिकिटे काळ्याबाजारात विकण्यात आल्याचा संशय स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत व्यक्त केला़ अशी तिकिटे बेस्ट उपक्रमालाही मिळाली असतील तर त्याचे काय झाले, असा सवाल फणसे यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत उपस्थित केला़ याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिले़ (प्रतिनिधी)
क्रिकेट तिकिटांचा काळाबाजार?
By admin | Updated: April 1, 2016 02:44 IST