Join us  

डॉक्टरी पेशाची विश्वासार्हता आजही कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 11:18 PM

एका बाजुने आपण म्हणतो डॉक्टरी पेशा आणि दुस-या बाजुने डॉक्टरने मोफत उपचार करावा, अशी अपेक्षा ठेवतो. आज डॉक्टर लुटतात, अशी भावना प्रसिध्दीमाध्यमांमुळे समाजात पसरली आहे

मुंबई : देवानंतर रुग्णाचा कोणावर विश्वास असतो, तो म्हणजे डॉक्टर. आपल्या रुग्णाची प्रकृती ठणठणीत होण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र झटत असतात. अलीकडे डॉक्टरी पेशावरील अविश्वास वाढू लागला आहे. डॉक्टर लुटतात, चुकीचे निदान करतात, असा गैरसमज समाजात पसरला आहे. त्यामुळे लोकांमधील सहनशक्ती संपली असून डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांना सात वर्षांची शिक्षा व्हावी, याकरिता कायद्यात सुधारणा होण्याची गरज असल्याचा सूर मुंबईतील सरकारी व खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी लावला आहे. लोकमतमार्फत आयोजित ‘वेलनेस आयकॉन’ सोहळ्यातील परिसंवादात डॉक्टरी पेशा नेहमीच विश्वासार्ह राहील, असे मत या तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले. बॉम्बे रुग्णालयाचे फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी यांनी डॉक्टरी पेशा विश्वासार्ह राहिला आहे का? या परिसंवादात तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधला...

लोकमत वेलनेस आयकॉन २०१९’चा दिमाखदार प्रकाशन सोहळा बुधवारी परळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगला. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेत्री डॉ. आदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई आणि परिसरातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ््यास आवर्जून उपस्थित होते. सिमंधर हर्बल प्रा. लि. आणि श्री धूतपापेश्वर लि. यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

‘लोकमत’ आणि ‘एमजीएम’ हॉस्पिटल यांचा जुना स्नेह आहे. ‘लोकमत’ने यंदा सुरु केलेली वेलनेस आयकॉन ही संकल्पना सुंदर असून हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. ‘लोकमत’च्या या सन्मानामुळे आता जबाबदारी आणखी वाढल्याची जाणीव होत आहे. - एमजीएम हॉस्पिटल, नवी मुंबई

‘लोकमत’ने वेलनेस आयकॉनच्या रुपाने अतिशय चांगला उपक्रम सुरु केला आहे. कार्यक्रमातील पॅनल डिस्कशन तर आमच्यातील प्रत्येक डॉक्टरांचा जिव्हाळ्याचा विषय होता आणि तज्ज्ञांनी तो उत्तमरीत्या हाताळला आहे. - डॉ. साईनाथ बैरागी, संचालक, उमा फर्टालिटी सेंटर, ठाणे

डॉक्टर नेहमीच समाजासाठी कार्यरत असतात, आणि हे माझे कार्यक्षेत्र असल्याचा मला अभिमान आहे. या कार्याचा गौरव ‘वेलनेस आयकॉन’तर्फे केला गेला आणि दखल घेतली गेली याबद्दल ‘लोकमत’चे आभार - डॉ. गौरी चव्हाण, कॉस्मोटॉलॉजिस्ट, मुंबई

वेलनेस आयकॉनसारखी संकल्पना ‘लोकमत’ने दरवर्षी राबवावी ही अपेक्षा आहे. रुग्णांना डॉक्टरांसोबच्या संवादामुळे समाधान मिळत असते आणि प्रत्येक डॉक्टर ते करत असतो. अशाप्रकारच्या पुरस्कारामुळे डॉक्टर आणि रुग्णामधील संबंध आणखी उत्तमरीतीने सांभाळले जातील. - डॉ. विवेक लोलगे, एमडी , कालसिद्धी इनॉर्टिकल, ओझोन हॉस्पिटल, ठाणे

‘वेलनेस आयकॉन’ ही उत्तम संकल्पना उत्साह वाढविणारी आहे. नव्या पिढीसाठी निश्चितच उत्तम उपक्रम आहे. चांगल्या आणि सामाजिक कामांसाठी लोकमतचा सहभाग नेहमीच राहिलेला आहे आणि तो पुढेही राहील अशी अपेक्षा आहे. - डॉ. विद्यासागर उमाळकर, कन्सल्टिंग होमीओपॅथ, पुणे, मुंबई

समाजात डॉक्टर कुठे आणि कसे काम करतात? लोकांसाठी नेमके काय करतात याची कल्पना समाजाला असायला हवी. या कामाची दखल आणि निरीक्षणे यांची नोंद ‘लोकमत’ ठेवत आहे हे उत्तम होत आहे. - डॉ. गुरुनाथ बिराजदार, होमीओपॅथ, ठाणे

‘वेलनेस आयकॉन’सारख्या उत्तम संकल्पनेच्या पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी ‘लोकमत’चा खूप खूप आभारी आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते हा सन्मान मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योग्य आहे. हा पुरस्कार म्हणजे आयुष्यातील माईलस्टोन असल्यासारखा आहे. - डॉ. राजेंद्र चांदोरकर, पेडिट्रिशिअन, रायगड

डॉक्टरी पेशा विश्वासार्ह होता, आहे आणि नेहमीचं राहणार. सरकारी आणि महापालिका रूग्णालयात येणा-या रूग्णांची संख्या खूप जास्त आहे. येथील निवासी डॉक्टर १८ तास काम करीत असतो. तरीही डॉक्टरला मारहाण होण्यासारखे दुर्दैवी प्रकार घडतात. कायद्याने डॉक्टरांना संरक्षण मिळाले, मात्र मारहाण करणाºया व्यक्तीला जमीन लगेचचं मिळतो. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करुन थेट सात वर्षांची शिक्षा होणे अपेक्षित आहे. तसेच लोकांची सहनशक्तीही वाढविण्याची गरज आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या संख्या वाढविणे आणि त्यांच्या कामाची वेळ निश्चित करण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. - डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक

एका बाजुने आपण म्हणतो डॉक्टरी पेशा आणि दुस-या बाजुने डॉक्टरने मोफत उपचार करावा, अशी अपेक्षा ठेवतो. आज डॉक्टर लुटतात, अशी भावना प्रसिध्दीमाध्यमांमुळे समाजात पसरली आहे. भारतात औषधांची कमी नाही, काही चाचणी न केलेली पण स्वस्त औषधही मिळतात. पण रूग्णाला बर करण्यासाठी प्रयोग करून चालत नाहीत. कर्करोगासारख्या आजारामध्ये रुग्णाला दुसरी संधी मिळत नाही. त्यासाठी चांगल्यातली चांगली औषध वापरावी लागतात. सर्व औषधंं एकाच प्रकारची असल्याचे सरकारने सिद्ध केल्यास दुस-या दिवसापासूनचं त्यावर अमल करू. - डॉ. श्रीपाद बाणावली, टाटा मेमोरिअलच्या मेडिसीन आणि पेडिएट्रिक आॅन्कोलॉजी विभागप्रमुख

अत्यावश्यक काळात डॉक्टर आॅन दि स्पॉट निर्णय घेत असतो. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध झाल्यास सरकारी व महापालिका रुग्णालयांवरील ताण वाढणार नाही. डॉक्टरांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर होत असतो. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर जागा वाढविण्याची गरज आहे. - डॉ. गिरीश मैंदारकर, कॉलेज आॅफ फिजिशिअन्स अँड सर्जन्स

डॉक्टर रुग्णांची काळजी घेतो, त्याप्रमाणे त्याने स्वत:ची काळजी घेणेही आवश्यक आहे. अलीकडे तरुण डॉक्टरांमध्ये आत्महत्येचे प्रमाण दिसून येत आहे. मानसिक तणावाखाली असलेले दररोज दोन ते तीन डॉक्टर माझ्या दवाखन्यात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे डॉक्टरांनाचं आता आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे कार्य करावे लागत आहे. डॉक्टरांनी दररोज संपूर्ण दिवसातील दहा मिनिटं जगाशी अलिप्त होऊन फक्त ध्यानधारणा करावी. मानसिक शांतता आणि स्थिरतेत स्वत:शी चांगला संवाद साधता येतो. - डॉ. राजेंद्र बर्वे, परिवर्तन- द टर्निंग पॉइंट संस्थेचे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

रात्र झोपण्यासाठी तर दिवस काम करण्याकरिता असते. त्यामुळे दिवसरात्र काम करण्याऐवजी डॉक्टरांनी आपल्या कामाची मर्यादा निश्चित करण्याची गरज आहे. डॉक्टर झोपचं घेणार नाही तर त्यांचं डोकं शांत कसे राहील. अत्यावस्था रुग्ण उपचारासाठी आल्यास वेळ-काळाचा विचार न करता त्याच्यावर तात्काळ उपचार करा. परंतु रात्रीपर्यंत रुग्ण येतचं आहेत, असे करु नका. डॉक्टरांनीही थोडी विश्रांती घेण्याची गरज आहे. - डॉ. हंसा योगेंद्र, संचालिका, दि योग इन्स्टिट्यूट

वेलनेस आयकॉनच्या माध्यमातून रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील दुवा साधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ करत आहे. सोबतच मला दिलेल्या पुरस्कारसाठीही धन्यवाद. - डॉ. विश्वास परुळेकर, संचालक, परुळेकर हॉस्पिटल

‘लोकमत’ ब्रँड हा महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. अशा ब्रँडकडून हा पुरस्कार मिळणे म्हणजे मोठी गोष्ट आहे, त्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. - डॉ. रुपेश सिंग, व्यवस्थापक, एमडी डॉ सिंग एडव्हान्स होमीओपॅथी

या पुरस्कारासाठी मी माझ्या कुटुंबाचे आणि विशेषत: वडिलांचे आभार मानत आहे. त्यांच्या पाठींब्यामुळे मी इथपर्यंत पोहचू शकलो. महत्त्वाचे म्हणजे माझ्या रुग्णांचेही आभार मी मानू इच्छित आहे, त्यांच्या सेवेमुळेच मला या सन्मानाची संधी मिळाली आहे. - डॉ. रजत जाधव, कन्सल्टिंग आय सर्जन, नवी मुंबई

वेलनेस आयकॉन हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. डॉक्टर हे खरे तर मोठया प्रमाणात समाजसेवेचे काम करत असतात. या समाजसेवेची पावती म्हणजे हा पुरस्कार आहे, असे मी मानतो. - डॉ. पी. व्ही. महाजन, युरोसर्जन अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर, नवी मुंबई

डॉक्टर, संस्था, हॉस्पिटल्स सारेच समाजासाठी काम करत असतात, हे कुठेतरी परावर्तित होणे आवश्यक आहे. लोकमतचं वेलनेस आयकॉन मार्फत ते होणार आहे. डॉक्टरांच्या अंतर आत्म्याचा आवाज ऐकून लोकमतने सुरु केलेल्या या परस्कारासाठी आम्ही सर्वजण ऋणी राहणार आहोत. - डॉ. कैलाश पवार, सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे

डॉक्टर आपल्या कामामार्फत समाजची सेवा करत असतात. त्यांच्या कामाची दखल ‘लोकमत’ने घेतली असल्याने वेलनेस आयकॉनसाठी त्यांचे खूप खूप आभार. - डॉ. शेखर सुराडकर, प्रॅक्टिसिंग सर्जन, ठाणे

वेलनेस आयकॉन हा डॉक्टरांसाठी लोकमतने उभारलेले चांगले व्यसपीठ आहे. आजचे पॅनल डिस्कशनमधील विषय हा खूप महत्त्वाचा होता शिवाय तो अतिशय उत्तमरीतीने मांडला ही गेला यासाठी ‘लोकमत’चे विशेष अभिनंदन - डॉ. सुनील बिºहाडे, पेडीट्रिशिअन, वसई

वैद्यकीय व्यवसायासंबंधी सुरू केलेला वेलनेस आयकॉन हा नवीन उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. डॉक्टर आणि रुग्णांमधील दारी हल्ली वाढत चालली आहे. 

टॅग्स :लोकमत