Join us

निर्मात्याला लाखोंचा गंडा घालणाऱ्याला अटक

By admin | Updated: March 4, 2015 01:14 IST

दीडशे कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका चित्रपट निर्मात्याला लाखोंचा गंडा घालणाऱ्याला चारकोप पोलिसांनी भार्इंदर या ठिकाणी असलेल्या त्याच्या घरून शनिवारी अटक केली.

मुंबई : दीडशे कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका चित्रपट निर्मात्याला लाखोंचा गंडा घालणाऱ्याला चारकोप पोलिसांनी भार्इंदर या ठिकाणी असलेल्या त्याच्या घरून शनिवारी अटक केली. त्याने अशाच प्रकारे अनेकांना फसविल्याचा शक्यता आहे, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता चारकोप पोलिसांनी वर्तविली.राहुल प्रजापती (३०) असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. या प्रकरणातील तक्रारदार मंगेश शिंदे (४२) हे बांधकाम व्यावसायिक असून चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. प्रजापती हा मोठमोठ्या उद्योजकांना गाठून त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष द्यायचा. नोव्हेंबर महिन्यात शिंदेची ओळख प्रजापतीशी झाली. त्याने त्यांना ओशिवरा परिसरात असलेल्या त्याच्या कार्यालयात भेटण्यास बोलावले. हे कार्यालय त्याने आॅक्टोबर महिन्यात भाडे तत्त्वावर घेतले होते. त्याचे ते पॉश कार्यालय, उंची राहणीमान पाहून शिंदे त्याच्या बोलण्यात फसले. कर्ज मिळविण्यासाठी करण्याच्या प्रोसेसचा खर्च सहा लाख रु पये असल्याचे त्याने शिंदे यांना सांगितले. त्यानुसार प्रजापतीच्या बँक खात्यामध्ये त्यांनी पाच लाख रु पये टाकले, तर एक लाख रु पये रोख सुपुर्द केले. त्यानंतर मात्र प्रजापती त्यांना टाळाटाळ करू लागला आणि अचानक एक दिवशी ओशिवऱ्यातील कार्यालय बंद करून तो पसार झाला.ही बाब समजताच शिंदे यांनी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरोधात तक्र ार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत भार्इंदर परिसरातून प्रजापतीला अटक केली. (प्रतिनिधी)