Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची नामांकित महाविद्यालयांची क्रेझ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:08 IST

अकरावी प्रवेश प्रक्रिया : आधीचे प्रवेश रद्द करण्याचीही तयारीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळूनही हव्या ...

अकरावी प्रवेश प्रक्रिया : आधीचे प्रवेश रद्द करण्याचीही तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळूनही हव्या असलेल्या दुसऱ्या नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी ९० टक्क्यांच्या वरील विद्यार्थी, पालकांची धडपड विशेष फेरी झाल्यानंतरही दिसून येत आहे. त्यासाठी ते मुंबई उपसंचालक कार्यालयात गर्दी करीत आहेत.

मुंबई विभागात अकरावी प्रवेश प्रक्रियेत तीन फेऱ्या आणि एक विशेष फेरी मिळून आतापर्यंत एकूण १ लाख २ हजार ३४० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयाची अलॉटमेंट मिळाली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत १ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर अद्याप १ लाख ५५ हजार जागा रिक्त आहेत.

बुधवारी विशेष फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्चितीसाठी अखेरचा दिवस हाेता. मात्र, अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी नामांकित आणि पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने बेटरमेंटचा पर्याय स्वीकारला. यामुळेच अद्याप १ लाखाहून अधिक विद्यार्थी प्रवेशाविना आहेत.

फेरी - पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी

प्रवेश फेरी १ - ४०,४७६

प्रवेश फेरी २ - २०,३७१

प्रवेश फेरी ३ - ६,१७९

विशेष फेरी १ - ३५,३१४

एकूण - १,०२,३४०

...................