Join us  

राणीच्या बागेत अखेर पाळणा हलणार,  ४० दिवसांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 5:22 AM

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलणार आहे. पेंग्विनच्या तीनपैकी एक जोडीतील मादा पेंग्विनने गुरुवारी अंडे दिले आहे.

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलणार आहे. पेंग्विनच्या तीनपैकी एक जोडीतील मादा पेंग्विनने गुरुवारी अंडे दिले आहे. त्यामुळे मुंबईतच नव्हेतर, संपूर्ण देशात पहिल्यांदाच पेंग्विनचा जन्म होणार असल्याने राणीच्या बागेत आनंदाला उधाण आले आहे. मात्र या बाळंतपणाला आणखी ४० दिवसांची प्रतीक्षा आहे.गेल्या दोन वर्षांत हे सात पेंग्विन मुंबईच्या वातावरणात चांगलेच रमले असून त्यांनी आपले जोडीदारही निवडले आहेत. मात्र त्यांच्यामध्ये सर्वांत कमी वयाचा असलेला मिस्टर मॉल्ट(तीन वर्षे) आणि त्याची जोडीदार फ्लिपर(साडेचार वर्षे) यांनी ही गोड बातमी दिली आहे.मार्च-एप्रिल आणि आॅक्टोबर-नोव्हेंबर हा पेंग्विनच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात मादा पेंग्विन महिन्याभरात अंडे देते. त्यानंतर ४० दिवसांमध्ये या अंड्यातून पिल्लू बाहेर येते. या छोट्या पेंग्विनच्या जन्माला अद्याप सव्वा महिना असला तरी राणीच्या बागेत त्याच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे.मात्र, जन्मानंतर केवळ या पिल्लाचे वजन व त्याला पोषण मिळत आहे का? याची काळजी घेण्यात येणार असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :मुंबई