Join us
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार प्रांत कार्यालयावर माकपाचा मोर्चा

By admin | Updated: June 21, 2015 22:52 IST

जव्हार तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी सेक्रेटरी व जिल्हा परिषद सदस्य रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भर

जव्हार : जव्हार तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी सेक्रेटरी व जिल्हा परिषद सदस्य रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भर पावसातही प्रांत कार्यालयावर हजारो कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्यात आला.तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जव्हार बस स्टॉप समोरील नगरपरिषदेचे ग्राऊंड ते गांधी चौक, पाचबत्ती नाका व यशवंतनगर येथून येऊन प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी वनजमिनीचा सातबाराचा उतारा जीपीएसने मोजणी करून वाढीव क्षेत्र देण्यात यावे, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, महिन्याकाठी रेशनिंग दुकानांना धान्य वितरीत करावे, नदीजोड प्रकल्प रद्द करावा, जव्हार-मोखाडा तालुक्यातील स्थानिकांना नोकऱ्यात प्राधान्य द्यावे, धनगर समाजाला आदिवासी कायद्यामध्ये समाविष्ट न करता त्याबाबतचा कायदा रद्द करावा, जव्हार मोखाड्यात रोजगार हमीची कामे चालूच ठेवावी, ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, पेसा कायद्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी प्रत्येक मुलाची शिक्षणाची सोय करावी, ज्युनिअर कॉलेजला ११ वी प्रवेशासाठी तुकडीची सोय करा, रहिवासी दाखला अंतिम पुरावा मानावा अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य कमिटी मेंबर कॉ लक्ष्मण जाधव, जिल्हा कमिटी मेंबर, शिवराम घटळ, जिल्हा कमिटी सदस्य बाबू ढिगारे, विजय शिंदे, सहभागी झाले. (वार्ताहर)