Join us

मुलुंड येथे २४ तास सेवा देणारे कोविड वॉर रूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 04:04 IST

मुलुंड येथे २४ तास सेवा देणारे कोविड वॉर रूमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने ...

मुलुंड येथे २४ तास सेवा देणारे कोविड वॉर रूम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळेत बेड, रुग्णवाहिका, औषधे आणि ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यासाठी नेमकी कोणाकडे मदत मागावी व कुठे विचारपूस करावी याबाबत सामान्य नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. मात्र नागरिकांना मदत मिळावी व योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. मुलुंड येथे मनसेने २४ तास सेवा देणारे मनसे कोविड वॉर रूम हे मुलुंडच्या केशवपाडा परिसरात उभारले आहे.

या वॉर रूमच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजनची व्यवस्था करून देणे, औषधे कुठे मिळतील याची माहिती देणे, गृहविलगीकरणामध्ये असलेल्या कुटुंबाची मोफत जेवणाची व्यवस्था करणे, अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वॉर रूमचे क्रमांक समाजमाध्यम आणि फ्लेक्सद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. या वॉर रूमच्या माध्यमातून आतापर्यंत पाचशेहून अधिक नागरिकांना मदत मिळाली आहे. सर्व पक्षांनी प्रशासनाच्या मदतीसाठी या प्रकारे पुढे यायला हवे, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

............................