Join us
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक पेजवर कोविड अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:06 IST

मुंबई : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आता फेसबुकच्या सहकार्याने ‘कोविड अलर्ट’ या सुविधेच्या माध्यमातून राज्य शासन घेत असलेल्या महत्त्वाच्या ...

मुंबई : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आता फेसबुकच्या सहकार्याने ‘कोविड अलर्ट’ या सुविधेच्या माध्यमातून राज्य शासन घेत असलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती राज्यातील जनतेला देत आहे. facebook.com/MahaDGIPR कोविडसंदर्भातील महत्त्वाच्या घोषणा आणि निर्णयांची माहिती प्रसारित करेल.

.............................................................

नामांकने सादर करण्याचे आवाहन

मुंबई : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार व मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांसाठी) २०२१ नामांकन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

.............................................................................

कृष्णविवर कथेचे ऑनलाईन वाचन

मुंबई : मराठी विज्ञान परिषदेने ७ ते ११ जूनदरम्यान ऑनलाईन विज्ञान कथामाला आयोजित करण्यात आली आहे. यात कॅ. सुनील सुळे (कथा-शेवटची मोहीम), स्वरा मोकाशी (कोरी पाटी), शरद पुराणिक (सावळी मधुगंधा), डॉ. मेघश्री दळवी (संभ्रम) अनुक्रमे स्वलिखित विज्ञान कथाकथन करतील. शेवटच्या दिवशी मंजिरी पाठक, डॉ. जयंत नारळीकरांच्या कृष्णविवर या कथेचे वाचन करतील.

--------------

काेराेना काळातही वाहतूककोंडी कायम

मुंबई : मुंबई आणि ठाणे शहरास जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर कोरोना काळातही वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात रस्त्यावर वाहनांची संख्या कमी असूनही केवळ येथे सुरू असलेल्या कामामुळे शीतल आणि कमानी या दोन ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी कोंडी वाढत आहे.

---------------------------------