मुंबई : पोलीस उप महानिरीक्षक सुनील पारसरकर यांच्याविरोधातील आरोपपत्र दाखल करून घेण्यास कुर्ला न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला़अॅड़ चित्रा साळुंखे यांनी आयपीसी कलम ५०६(२)अंतर्गत ही तक्रार केली आहे़ एका मॉडेलच्या बलात्कार प्रकरणात धमकी दिल्याचा आरोप पारसकर व इतर दोघांवर आहे़ पोलिसांनी याचे आरोपपत्र तयार करून ते न्यायालयात सादर केले़ यास पारसकर यांचे वकील जयेश वाणी यांनी विरोध केला़ या आरोपाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे़ असे असतानाही पोलिसांनी ही परवानगी न घेताच तपास केला़ तेव्हा याचे आरोपपत्र दाखल होऊ शकत नाही, असा युक्तिवाद अॅड़ वाणी यांनी केला़ तो ग्राह्य धरीत न्यायालयाने हे आरोपपत्र दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे अॅड़ वाणी यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
सुनील पारसकर यांना कोर्टाचा दिलासा
By admin | Updated: January 3, 2015 02:25 IST