Join us

नवी मुंबईतील अवैध नऊ इमारतींवर कोर्ट रिसिव्हर

By admin | Updated: July 15, 2015 02:51 IST

नवी मुंबईतील दिघा परिसरातील नऊ इमारती बेकायदा असल्याचे स्पष्ट झाल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी या इमारतींवर कोर्ट रिसिव्हर नेमला. या इमारती कोर्ट रिसिव्हरच्या

मुंबई: नवी मुंबईतील दिघा परिसरातील नऊ इमारती बेकायदा असल्याचे स्पष्ट झाल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी या इमारतींवर कोर्ट रिसिव्हर नेमला. या इमारती कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असल्याचे फलक आता येथे लावले जाणार आहेत. नऊपैकी दोन इमारतींमध्ये रहिवासी राहत असून, इतर इमारती बांधकामाधीन आहेत. यात काही व्यावसायिक गाळ्यांचाही समावेश आहे.दिघा येथील सर्व्हे क्रमांक ४० (९६ गुंठे), २५२(२)(४ गुंठे) व १९८(२१ गुंठे) या भूखंडावर अंदाजे १०० अवैध इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्या पाडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका घणसोली येथील राजीव मोहन मिश्रा यांनी अ‍ॅड. दत्ता माने यांच्यामार्फत केली आहे. या याचिकेवर न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात तेथील तहसिलदार यांनी दिघा परिसरातील इमारतींचा सर्व्हे करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. यामध्ये नऊ इमारती बेकायदा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिले. तसेच दिघा परिसरातील इतर अवैध इमारतींचा आढावा घेण्याचे आदेश न्यायालयाने तहसिदार व याचिकाकर्त्यांना दिले आहेत. आता या याचिकेवर पुढील शुक्रवारी सुनावणी होणार असून त्यात दिघामधील इतर अवैध इमारतींचा तपशील तहसिलदार व याचिकाकर्त्यांना द्यावा लागणार आहे. एकवीरा आणि सीताराम पार्क या इमारतीत रहिवासी राहतात, अशी माहिती अ‍ॅड. माने यांनी दिली. (प्रतिनिधी)या इमारती कोर्ट रिसिव्हरकडेएकवीरा हाईट्स : सहा मजलीसुलोचना अपार्टमेंट : पाच मजलीसीताराम पार्क : पाच मजलीकल्पना हाईट्स : सात मजलीनाना पार्क : पाच मजलीओमकारेश्वर प्लाझा : पाच मजलीआगीवले हाईट्स : सात मजलीसावित्री हाईट्स : सात मजलीअमृतधाम : चार मजली