Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुरियर कंपनीची होणार चौकशी

By admin | Updated: October 8, 2015 05:12 IST

रोमानियन स्किमर टोळी प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा स्वत: डाटा चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य बनवत होता. यासाठीचे साहित्य तो कुरियर

मुंबई : रोमानियन स्किमर टोळी प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा स्वत: डाटा चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य बनवत होता. यासाठीचे साहित्य तो कुरियर कंपनीद्वारे मागवत असल्याने संबंधित कुरियर कंपनीची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.वांद्रे येथील रहिवाशी असलेल्या कॅन्डिस पॉल फर्नांडिस यांच्या खात्यातून १४ सप्टेंबर रोजी पैसे काढण्यात आले होते. मोबाईलवर आलेल्या एसएमएस नंतर फर्नांडिस यांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी या रोमानियन टोळीला अटक केली. १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत असलेले आरोपी अलीन बुडोई (३१), मारियन ग्रामा (४२), म्यू आयोनेल (४२) यांच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. या टोळीचा म्होरक्या बुडोई हा तंत्रज्ञानामध्ये मास्टर असल्याने तो स्वत: डाटा चोरीसाठी लागणारे डिव्हाईस घरीच बनवत होता. यासाठी लागणारे साहित्य तो कुरियर कंपनीच्या माध्यमातून मागवत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, संबधित कुरियर कंपनीची चौकशी होणार असल्याची माहिती विनोबा भावे नगर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)