मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोरेगाव पूर्व येथील मुंबई एक्झिबिशन सेंटर येथील नेस्कोमध्ये होती. भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्या विजयाची खात्री असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. त्यातच नरेंद्र मोदींचे डुप्लिकेट विकास मोहंती नेस्को येथे पोहोचताच त्यांना पाहण्यासाठी परिसरात एकच गर्दी जमली व संपूर्ण परिसर मोदीमय झाला. निवडणूक आयोगाने परिसरात प्रवेशास बंदी घातल्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वनराई व महानंदा परिसरात महायुतीचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. काही कार्यकर्त्यांनी नेस्को परिसरात ठाण मांडल्याने पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. (प्रतिनिधी)
मतमोजणी केंद्र झाले डुप्लिकेट मोदीमय
By admin | Updated: May 17, 2014 02:21 IST