Join us

नगरसेवकांचे टॅब परत घेणार

By admin | Updated: February 16, 2015 05:01 IST

नगरसेवकांना देण्यात आलेले टॅब ही महापालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या सदस्यत्वपदाचा कार्यकाळ संपुष्टात येताच

कमलाकर कांबळे, नवी मुंबईनगरसेवकांना देण्यात आलेले टॅब ही महापालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या सदस्यत्वपदाचा कार्यकाळ संपुष्टात येताच हे टॅब परत घेण्याचे संकेत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहे. तत्पूर्वी टॅब देण्याच्या मूळ प्रस्तावाची चाचपणी करून हा निर्णय जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.महापालिकेने गतिमानता व पारदर्शक कारभारासाठी ई-टेंडरिंग प्रणालीचा अवलंब केला आहे. तसेच संपूर्ण कारभार पेपरलेस करण्याच्यादृष्टीने नगरसेवक व अधिकाऱ्यांना टॅब देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना १२२ टॅबचे वाटप करण्यात आले होते. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती व अन्य विषय समित्यांचे प्रस्ताव अथवा इतिवृत्त टॅबच्या माध्यमातून नगरसेवकांपर्यंत पोहचवण्याचा प्रशासनाचा मनोदय होता. या टॅबसाठी जवळपास ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. नगरसेवकांना देण्यात आलेले टॅब ही महापालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे नियमानुसार नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर संबंधितांकडून सदर टॅब परत घेतले जातील. टॅब देण्यासंदर्भातील प्रस्तावाची चाचपणी करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तर विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आला आहे. नगरसेवकांना देण्यात आलेले टॅब ही महापालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांनी सदरचे टॅब महापालिकेला परत करणे अपेक्षित आहे. कारण महापालिकेत नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांना हेच टॅब द्यावे लागणार आहेत, असे स्पष्ट मत महापौर सागर नाईक यांनी यासंदर्भात बोलताना व्यक्त केले आहे.