Join us
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या निवृत्तिवेतनाचा प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: July 2, 2014 00:27 IST

आधीच डबघाईला आलेल्या महापालिकेला आता आणखी एका संकटाला समोरे जाण्याची वेळ आली आहे. खासदार, आमदारांप्रमाणे पाच वर्षांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर पालिका सदस्यांनाही निवृत्तिवेतन देण्यात यावे

ठाणे : आधीच डबघाईला आलेल्या महापालिकेला आता आणखी एका संकटाला समोरे जाण्याची वेळ आली आहे. खासदार, आमदारांप्रमाणे पाच वर्षांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर पालिका सदस्यांनाही निवृत्तिवेतन देण्यात यावे, अशा आशयाची सूचना शिवसेनेच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे यांनी केली होती. त्यांची ही सूचना मंजूर झाली असून आता या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात येऊन तो पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. परंतु हे वेतन किती असेल, कशा पद्धतीने दिले जाईल, याबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. सध्या ठाणे पालिका आर्थिक डबघाईला आली आहे. पालिका तिजोरीत एलबीटी, मालमत्ता कर आणि इतर विभागांकडून होणारी वसुली फारशी चांगली न झाल्याने त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पालिका आयुक्तांनीसुद्धा याच मुद्द्याला हात घालून, जोपर्यंत पालिकेची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत ठेकेदारांची बिले अदा करू नका, असा फतवा काढला आहे. (प्रतिनिधी)