Join us
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची ई-फिल्डिंग!

By admin | Updated: September 23, 2014 02:22 IST

आघाडीत बिघाडी अथवा महायुती तुटतेय याकडे अवघ्या मुंबापुरीचे लक्ष वेधले असताना इच्छुक नगरसेवकांनी मात्र ई-प्रचारात आघाडी घेतली आहे़

शेफाली परब-पंडित, मुंबईआघाडीत बिघाडी अथवा महायुती तुटतेय याकडे अवघ्या मुंबापुरीचे लक्ष वेधले असताना इच्छुक नगरसेवकांनी मात्र ई-प्रचारात आघाडी घेतली आहे़ सोशल मीडियाच्या माध्यमातून यापैकी अनेकांची प्रचार फेरीही रंगात आली आहे़ वॉर्डातील कामांचे छायाचित्र व पक्षश्रेष्ठींशी असलेल्या जवळकीचे छायाचित्र दाखवून आमदारकीसाठी अप्रत्यक्ष दावा केला आहे़ त्यामुळे इच्छुकांच्या समर्थकांमध्येही ई-वॉर पेटू लागले आहे़विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून १५ आॅक्टोबर रोजी मतदानाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे़ परंतु शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावरून एकमत होत नसल्याने अद्याप एकाही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत़ त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या बोहल्यावर बसण्यास आतुर इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे़ त्यामुळे आपली दावेदारी कायम राहण्यासाठी अनेकांनी तिकीट मिळण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे़सोशल मीडियाचा मतदारांवर विशेषत: तरुणांवर विशेष प्रभाव असल्याने या मतदाराला आकर्षित करण्याची मोहीमच काहींनी उघडली आहे़ मतदारसंघातील आपला जनसंपर्क, केलेल्या नागरी कामांची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात टाकण्यास या इच्छुकांनी सुरुवात केली आहे़ दररोज एक तरी पोस्ट सोशल मीडियावर पडून लोकांचा त्याला प्रतिसाद मिळेल, याची खात्री इच्छुक नगरसेवक करून घेत आहेत़