Join us  

कोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 6:31 AM

मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या (कोस्टल रोड) कामाला अखेर मुहूर्त मिळाला.

मुंबई : मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या (कोस्टल रोड) कामाला अखेर मुहूर्त मिळाला. या प्रकल्पांतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट ते बडोदा पॅलेसपर्यंतचे काम लार्सन अँड टुब्रो आणि बडोदा पॅलेस ते वरळी-वांद्रे सागरी सेतूचे टोक येथील काम हिंदुस्थान कंस्ट्रक्शन कंपनी व एचडीसी या संयुक्त कंपनीला मिळाले आहे. या प्रकल्पासाठी तब्बल आठ हजार कोटींचा खर्च करण्यात येईल. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला.मुंबईतील वाहतूककोंडीवर मात्रा म्हणून सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोडची संकल्पना पालिकेने मांडली. हा शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नरिमन पॉइंट ते मालाड मार्वेपर्यंत समुद्र्र किनारपट्टीलगत भराव टाकून मुंबई किनारा रस्ता प्रकल्पांचे काम हाती घेतले जाईल. भराव टाकून रस्ता बांधणे, काही ठिकाणी पूल, उन्नत मार्ग, आवश्यकतेनुसार बोगदे असे एकूण ३५.६० किमी लांबीच्या समुुद्रकिनारी मुक्त मार्गाचे काम करण्यात येईल. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचे काम महापालिका करेल.>वाहतूककोंडी फुटणारप्रकल्पासाठी गिरगाव चौपाटी येथे भूमिगत बोगदा बांधण्यात येत आहे. चौपाटी येथून निघालेला हा बोगदा थेट प्रियदर्शनी पार्कजवळ बाहेर पडेल. त्यामुळे काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा होणार नाही. तिथून हा प्रकल्प वांद्रे सागरी सेतू ते गोराई असा प्रवास करेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातून उपनगरात जाण्यास दोन तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांचा होईल.>प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान -ठेकेदार-एल अँड टी-खर्च ३,५०५ कोटी रुपयेप्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस : एल अँड टी - २,७९८ कोटी रुपयेबडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक:एचसीसी-एचडीसी- २,१२६ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी लिंकपर्यंत ९.९८ किमीचे काम २०१९ पर्यंत करण्यात येईल.त्यानंतर वांद्रे सी लिंक ते कांदिवली या दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यात येईल.किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचे बांधकाम करून कोस्टल रोडची बांधणी केली जाईल.पहिल्या टप्प्यासाठी ५३०३.३४ कोटींचा खर्च येईल.कोस्टल रोडवर रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र पावणेतीन मीटर रुंदीची मार्गिका असेल.