Join us  

सीएसएमटी सौंदर्यीकरणाचा खर्च ५१ कोटी, छोट्या-छोट्या नक्षीला नवीन रूप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 4:56 AM

मुंंबईची ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज वास्तूला पूर्वीची झळाळी मिळावी यासाठी मध्य रेल्वे तब्बल ५१ कोटी रूपये खर्च करीत आहे.

मुंबई : मुंंबईची ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज वास्तूला पूर्वीची झळाळी मिळावी यासाठी मध्य रेल्वे तब्बल ५१ कोटी रूपये खर्च करीत आहे. १३२ वर्षाच्या या वास्तूचे नुतनीकरण करण्यासाठी जोरदार काम सुरू आहे.सीएसएमटी मुख्यालयातील ‘स्टार चेंबर’ संपूर्ण वास्तूचा आत्मा आहे. या इमारतीचा मुख्य गाभ्यातील छोट्या-छोट्या नक्षीला नवीन रूप दिले जात आहे. सुमारे १०० खिडक्यांची तावदाने आणि १२० दरवाज्यांची दुरूस्ती करण्यात येत आहे. यामुळे या खिडक्या आणि दरवाज्यांचे सौंदर्य अधिक खुलले आहे. सीएसएमटीतील दर्शनी भिंतीचे रूप नव्याने घडवित असताना स्थानकावरील छतही बदलले जात आहे. बऱ्याच वर्षांनी एक ते सात क्रमांकाच्या छताचेही नुतनीकरण केले जात आहे.असा आहे इतिहाससीएसएमटीच्या इमारत १८७८ साली बनविण्यास सुरूवात केली आणि १८८८ पूर्ण झाली. त्यानंतर १९२९ या वास्तूचे काम करण्यात आले होते. या वास्तूला २००४ साली युनेस्कोच्यावतीने ‘जागतिक वारसा’ म्हणून घोषित करण्यात आले. या वास्तू वैभवाला देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनल्यामुळे, २०१६ साली देशातील १० महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये यास निवडण्यात आले. जगातील सर्वात सुंदर हेरिटेज स्थानकाची इमारत असल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.इंजिन दर्शनी भागातछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे मुख्यालयातील वस्तुसंग्रहालयात बार्शी लाइट रेल्वेचे ‘जी’ क्लास एन.जी. प्रकारातील इंजिनचे मॉडेल ठेवण्यात आले आहे. हे इंजिन मॉडेल १९८८-८९ या दरम्यान मध्य रेल्वेच्या कुर्डुवाडी कार्यशाळेत तयार करण्यात आले. इंजिनाला तिरंगी विद्युत रोषणाई लावण्यात आले असल्याने हे इंजिन पर्यटकांचे खूप आकर्षित केंद्र बनले आहे. हे मॉडेल सुरूवातीला बंद अवस्थेत होते. मात्र यामध्ये तांत्रिक दुरुस्ती करून ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मॉडेल इंजिनासह येथे माहिती फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय येथे अनेक पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.बार्शी लाइट रेल्वेचे ‘जी’ क्लास एन.जी. इंजिन एवरार्ड कालथ्रोपच्या निर्देशानुसार निस्मीथ विल्यन आणि कंपनीद्वारे या प्रकारातील इंजिन निर्माण करण्यात आले होते. या प्रकारातील पहिले इंजिन १९०४ मध्ये पहिल्यांदा खरेखुरे इंजिन चालविण्यात आले होते. त्यानंतर १९८३ पर्यंत या इंजिनाने आपली सेवा दिली.सीएसएमटीच्या मुख्य इमारतीला झळाळी देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये वस्तुसंग्रहालय अधिक आकर्षित करण्यात येत आहे. या बदलत्या रूपामुळे पर्यटकांची विशेषत: परदेशी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. यासह वस्तुसंग्रहालयात रेल्वेमधील अनेक जुने फोटो, इंजिन मॉडेल, ठेवण्यात आले आहेत.ही कामे सुरू आहेत...१ ते ७ क्रमांकाच्या फलाटावर छत१०० खिडक्या आणि १२० दरवाज्यांची दुरूस्तीस्टेशनच्या भिंतीची डागडुजीलाकडी जिन्याची दुरूस्तीनक्षीकामांची डागडुजीसीएसएमटीच्या घुुमटाला नवीन झळाळी दिली जात आहेराजस्थानी कारागिरांच्या हातून कामेसीएसएमटीचे सौंदर्य वाढविण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी कामगार आणि अधिकारी जोरात काम करत असून येत्या एप्रिल महिन्यात सीएसएमटीच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होणार आहे.- सुनील उदासी,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमुंबई