Join us
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका सुरेखा पाटील यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:06 IST

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपनगरसेविका सुरेखा पाटील यांना अटक९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी : धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपलोकमत ...

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

नगरसेविका सुरेखा पाटील यांना अटक

९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी : धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदिवलीतील प्रभाग क्रमांक २७ मधील भाजपच्या नगरसेविका सुरेखा पाटील यांच्या विरोधात समतानगर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फेसबुक तसेच व्हाॅट्सॲपवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवमानकारक प्रतिमा अपलोड केल्याचा त्यांच्यावर आराेप आहे. दरम्यान, पाटील यांनी संबंधित पोस्ट डिलीट करून जाहीर माफी मागितली.

पाटील यांनी ६ डिसेंबर रोजी कांदिवली पश्चिमेकडील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील परिसरात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला अभिवादन केले. या प्रतिमेवर आक्षेपार्ह खुणा असलेला फोटो त्यांनी फेसबुकवर अपलोड केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून साेमवारी त्यांना अटक केली. त्यांना बोरीवली कोर्टाने ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर अनावधानाने काही खुणा दाखविण्यात आल्याबाबत मी तमाम आंबेडकरी समाजाची माफी मागते. इतक्या महान महापुरुषाचा अवमान करण्याचा माझा उद्देश नव्हता, अशा भाषेत फेसबुकवरून पाटील यांनी सर्वांची माफी मागितली.

.........................