Join us
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीप्रकरणी नगरसेवक नील सोमय्यांकडे चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची मुलुंड पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची मुलुंड पोलिसांनी शनिवारी सुमारे दोन तास चौकशी केली. एका ठेकेदाराविरुद्धच्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. आवश्यकता वाटल्यास त्यांना पुन्हा पाचारण करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेची कामे करीत असलेल्या एका ठेकेदाराने खंडणीसाठी तिघांनी धमकाविले होते. त्याबाबत त्याने गेल्यावर्षी पोलिसांकडे तक्रार दिली. खंडणीचा प्रकार नील सोमय्या यांच्या कार्यालयात झाला होता, मात्र त्यावेळी सोमय्या तेथे उपस्थित नव्हते, असे त्याने तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या अनुषंगाने नील सोमय्या यांना शनिवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास कळविले होते. त्यानुसार दुपारी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. सुमारे दोन तास मुलुंड पोलीस ठाण्यात त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.