अजित मांडके - ठाणो
महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी सुरू असलेले शर्थीचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. एलबीटीचे उत्पन्नसुध्दा गेल्या दोन महिन्यांपासून 1क् ते 12 कोटींनी घटले आहे. त्यातच मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याने त्याचाही आता उत्पन्न वाढीवर परिणाम होणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरचे कर्मचा:यांचे वेतन निघेल एवढीच रक्कम शिल्लक आहे. कर्मचा:यांची नवरात्र आणि दिवाळी समाधानात जाईल, एवढीच समाधानाची बाब असल्याचे महापालिकेच्या सुत्रंनी सांगितले.
ठाणो महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचा उतारा सपशेल निष्प्रभ ठरला आहे. महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाल्यापासून आर्थिक डोलारा कोलमडला आहे. सुरुवातीला याचे खापर एलबीटी विभागावर फोडले गेले. परंतु, नंतर मालमत्ता, शहर विकास विभाग, अग्निशमन दल, जाहिरात विभाग आदींसह इतर महत्वाच्या विभागांकडून येणारे उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे या विभागांनीही आपले टार्गेट पूर्ण करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले होते. परंतु मधल्या काळात कर्मचा:यांचा पगार देण्याइतपतही पैसा तिजोरीत नसल्याने आयुक्तांनी ठेकेदारांची बिले अदा न करण्याचे फर्मान काढले होते. त्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत चांगलाच हंगामा झाला. त्यानंतर हा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी सहा जणांची उपसिमिती नेमण्यात आली. परंतु या उपसिमितीच्या चार महिन्यात केवळ दोनच बैठका झाल्या. त्यामध्येही उत्पन्नवाढीवर कोणताही तोडगा निघाला नाही.
दरम्यान आता एलबीटी जाईल अशा आशेवर ठाण्यातील व्यापारी आल्याने, त्यांनी एलबीटीचा भरण्याविरोधात असहकार पुकारला आहे, त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. या विभागाचे उत्पन्न मागील दोन ते तीन महिन्यांपासून पुरते कोलमडले असून महिन्याला या विभागाकडून 54 कोटींचे उत्पन्न अपेक्षित असतांना, ते 4क् ते 43 कोटींच्या घरात आले आहे. त्यात मार्गस्थ दाखला फी (एस्कॉर्ट) बंद झाल्याने त्याचाही परिणाम झाला आहे. महिनाकाठी 1क् ते 12 कोटींचा फटका या विभागाला सहन करावा लागत आहे. या सगळ्य़ाचा परिणाम महापालिकेच्या एकूण उत्पन्नावर झाला असून तिजोरीत कर्मचा:यांचे वेतन, वीज-पाणी बिल, यासाठी आवश्यक असणारा सुमारे 55 कोटींचाच निधी उपलब्ध आहे.
च्मालमत्ता कर विभागाकडून मागील महिन्यात अपेक्षित वसुली झाली असली, तरी आता आचारसंहितेमुळे वसुलीवर परिणाम होणार आहे. सर्वच विभागांतील कर्मचा:यांना निवडणुकीचे काम लागल्याने पालिकेच्या एकूण उत्पन्नावर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या काही महत्त्वाच्या विभागांना देण्यासाठीही तिजोरीत पैसा नाही.
महापालिकेत एलबीटीच
च्एलबीटी जाऊन महापालिकेत पुन्हा जकात लागू होईल, अशी आशा व्यापारी बाळगून आहेत. त्यामुळेच त्यांनी एलबीटी भरण्यास नकारघंटा वाजविली आहे.
च्महापालिकेत एलबीटीच राहणार असून व्यापा:यांनी लवकरात लवकर त्याचा भरणा करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसे न केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.