Join us

पालिकेने मागविला बेस्ट आर्थिक हिशोब

By admin | Updated: May 19, 2015 00:32 IST

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी महापालिकेने बेस्ट उपक्रमाला मदतीचा हात दिला आहे़ परंतु या निधीचा उपयोग बेस्ट कोणत्या प्रकारे करीत आहे,

मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी महापालिकेने बेस्ट उपक्रमाला मदतीचा हात दिला आहे़ परंतु या निधीचा उपयोग बेस्ट कोणत्या प्रकारे करीत आहे, आणखी किती काळ ही मदत द्यावी लागेल, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे़ या प्रकरणी आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिकाच जाहीर करण्याची मागणी स्थायी समितीमध्ये आज करण्यात आली़इंधन व वाहनांच्या सुट्या भागांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने बेस्ट आर्थिक खड्ड्यात गेली आहे़ करोडोंच्या तुटीत असलेल्या बेस्टचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी पालिकेने १५० कोटींचा निधी मंजूर केला़ यापैकी १०० कोटी रुपये देण्यात आले आहेत़ परंतु ‘बेस्ट’ भार आणखी किती काळ महापालिकेने उचलावा, असा सवाल स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केला़ पालिकेप्रमाणेच राज्य सरकारनेही बेस्टला सार्वजनिक उपक्रम म्हणून आर्थिक मदत व सबसिडी द्यावी, अशी मागणी मनसेचे सुधीर जाधव, भाजपाचे दिलीप पटेल यांनी केली़ उत्पन्नाचे स्रोत विकसित करण्यासाठी बेस्टकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे, अशी सूचना मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली़ मिळालेल्या निधीचा वापर बेस्ट कसा करीत आहे, याचा हिशोबच मांडण्याची मागणी सर्वपक्षीयांनी लावून धरली़ (प्रतिनिधी)बेस्ट उपक्रमाचा २०१४ ते २०१५ मधील ताळेबंद (आकडेवारी कोटींमध्ये)विद्युत परिवहन अपेक्षित ४,८३,९१,७६३प्रत्यक्ष४,६९,६१,५२३च्महापालिकेने २०११ मध्ये बेस्ट उपक्रमाला १,६०० कोटी रुपये कर्ज दिले़ परंतु हे कर्ज कामगारांची थकबाकी, वीज कंपनी व बँकांची देणी देण्यात गेले़च्हा निधी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास पुरेसा नसल्याने बेस्ट उपक्रमाने २फेब्रुवारी आणि एप्रिल २०१५ अशी दोन वेळा भाडेवाढ केली़महापालिकेची विशेष बैठकच्बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी स्थायी समितीपुढे बेस्टच्या आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली़ त्यानुसार बेस्टसंदर्भात लवकरच विशेष सभा बोलावण्यात येईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले़