Join us  

coronavirus: विशेष ट्रेनसाठी प्रतीक्षा यादीची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 12:30 AM

रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले. लॉकडाउनच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी १२ मेपासून काही ठरावीक मार्गांवर विशेष ट्रेन धावत आहेत.

 मुंबई : रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १५ शहरांसाठी विशेष गाड्या धावत आहेत. या विशेष ट्रेन सुरू करण्याच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वे मंत्रालयाने तिकिटांसाठी प्रतीक्षा यादी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, विशेष ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना प्रतीक्षा तिकीट काढता येईल.रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले. लॉकडाउनच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी १२ मेपासून काही ठरावीक मार्गांवर विशेष ट्रेन धावत आहेत. अनेक विशेष गाड्यांमधील सीट रिकाम्या राहिल्यामुळे आणि प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यामुळे ही सीट वाया जाऊ नये, आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्यानुसार, २२ मेपासून धावणाºया विशेष गाड्यांचे आरक्षण १५ मे रोजी करता येईल. या गाड्यांना प्रतीक्षा तिकीट देण्यात येणार असले तरी आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट नसेल.श्रेणी (क्लास) प्रतीक्षायादीची मर्यादाप्रथम श्रेणी एसी २०एक्झिक्युटिव्ह डबे २०द्वितीय श्रेणी एसी ५०तृतीय श्रेणी एसी १००एसी चेअर कार १००स्लीपर क्लास २००

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतीय रेल्वे