Join us  

coronavirus: उपस्थितीच्या सक्तीमुळे टपाल कर्मचारी नाराज, आरोग्याबाबत धास्ती

By खलील गिरकर | Published: July 06, 2020 1:52 AM

टपाल कार्यालयाची जागा मर्यादित असल्याने व या मर्यादित जागेत पोस्टमन व इतर कर्मचा-यांना हजर राहावे लागत असल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कामावर अनुपस्थित राहण्याचा मार्ग अवलंबला जात आहे.

- खलील गिरकरमुंबई : मुंबईतील कोरोनाचा प्रसार कमी झालेला नसल्याने टपाल कर्मचारी व अधिकारी आपला जीव धोक्यात टाकण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. टपाल कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीचे आदेश देण्यात आलेले असल्याने कार्यालयात हजर राहणे त्यांना अनिवार्य आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अद्याप टपाल कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यालयात येत नसल्याचे चित्र आहे. टपाल कर्मचाऱ्यांना लोकल सेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. लोकल प्रवासात कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. आजारपण, रजा व इतर मार्गांचा अवलंब करून कार्यालयात उपस्थित राहण्याचे टाळण्याकडे बहुतांश कर्मचाºयांचा कल आहे.टपाल कार्यालयाची जागा मर्यादित असल्याने व या मर्यादित जागेत पोस्टमन व इतर कर्मचा-यांना हजर राहावे लागत असल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कामावर अनुपस्थित राहण्याचा मार्ग अवलंबला जात आहे. जीपीओमधील टपाल खात्याच्या विविध कार्यालयात सुमारे एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतात. जीपीओमध्ये सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी इतर छोट्या टपाल कार्यालयांतील कर्मचाºयांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. टपाल कर्मचाºयांच्या सुरक्षिततेचा विचार करून १५ टक्के कर्मचाºयांना रोस्टरप्रमाणे बोलवावे अशी संघटनांची मागणी आहे. याबाबत मार्ग काढण्यासाठी दोन कामगार संघटनांनी मुख्य पोस्ट मास्टर जनरल(सीपीएमजी) हरीश अग्रवाल यांना पत्र दिले होते. त्यानंतर सीपीएमजीच्या निर्देशांनंतर याबाबत बैठकही पार पडली होती. त्यात तोडगा निघू शकला नाही.कर्मचाºयांच्या सुरक्षेची काळजी घेतली जातेटपाल कर्मचाºयांच्या सुरक्षेबाबत योग्य काळजी घेण्यात आली असून मास्क, सॅनिटायझर पुरवण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये टपाल कार्यालयाचा महसूल मोठ्या प्रमाणात घटला आहे. आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी टपाल कर्मचाºयांना कामावर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र व गोव्यामध्ये सुमारे ९६ टक्के कर्मचारी कामावर हजर आहेत.- हरीश अग्रवाल, मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र व गोवा

टॅग्स :पोस्ट ऑफिसकोरोना वायरस बातम्यामुंबई