Join us  

CoronaVirus News: दीड महिन्यात रुग्णसंख्या अडीच पट; सक्रिय रुग्णांचा आकडा पाच हजारांच्या वर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 9:10 AM

रुग्ण दुपटीच्या कालावधीत ८१४ दिवसांनी घट झाली आहे.

मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरणामुळे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यात पालिकेला यश आल्याचा दावा केला जात आहे. मात्र मागील दोन महिन्यांत निर्बंध शिथिल झाल्यानंतर दररोजच्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येत अडीच पटीने वाढ झाली. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा पाच हजारांच्या वर पोहोचला आहे. तसेच रुग्ण दुपटीच्या कालावधीत ८१४ दिवसांनी घट झाली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे १५ ऑगस्टपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानुसार दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. तसेच टकटक गाने शाळा आणि धार्मिक स्थळ व अन्य व्यवहार सुरू करण्यात आले. यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली, अनेक ठिकाणी नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, मागील काही दिवसांमध्ये दररोजची रुग्ण संख्या पाचशेपर्यंत पोहोचली आहे.अशी झाली रुग्ण संख्येत वाढऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात रुग्णवाढीची दैनंदिन सरासरी ०.०४ टक्के एवढी होती. तर सक्रिय रुग्णांची संख्या २,८३४ एवढी होती. मात्र दोन महिन्यांनंतर आता दिवसभरात तब्बल पाचशे रुग्ण आढळत आहेत. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या ५,३७९ वर पोहोचली आहे. रुग्णवाढीची दैनंदिन सरासरी ०.०६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.तारीख    रुग्ण     रुग्ण दुप्पट     संख्या    कालावधी १५ ऑगस्ट    २६७    १९२१ २५ ऑगस्ट    ३४३     १८८४ ५ सप्टेंबर    ४९६     १३६३ २५ सप्टेंबर     ४५४     ११९५ ५ ऑक्टोबर     ४३३    ११५४१५ ऑक्टोबर     ४५३     १०५७कोरोनाची तिसरी लाट आलेली नाही, तरी प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर नियमित करावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या