Join us  

CoronaVirus News : लोकल नाही, मुंबई धावू लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:45 AM

CoronaVirus News : जीवनवाहिनी सुरू झाल्याने थांबलेल्या प्रवाहाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा नव्याने उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबई : कधीही न थांबणारी लोकल कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी थांबली आहे. मात्र उपनगरीय रेल्वेमार्गावरील लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाली. सध्या दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत. जीवनवाहिनी सुरू झाल्याने थांबलेल्या प्रवाहाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा नव्याने उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.उपनगरीय लोकल आणि सर्वसामान्यांचे नाते जीवाभावाचे आहे. तीन महिन्यांपासून लोकल बंद असल्याने मुंबईचा वेग कमी झाला आहे. दरम्यान, १५ जूनपासून मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून राज्य सरकारने जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एकूण ३६२ फेºया सुरू झाल्यात. त्यामुळे मुंबई शहर आणि महानगर यामधील अंतर कमी झाले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी पश्चिम रेल्वेमार्गावर विरार ते चर्चगेट या दोन्ही दिशेकडे १४६ फेºया, मध्य रेल्वेमार्गावर कसारा/कर्जत/कल्याण ते सीएसएमटी दोन्ही दिशेकडे १३० फेºया, हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी दोन्ही दिशेकडे ७० फेºया आणि विरार ते डहाणू रोड दोन्ही दिशेकडे १६ फेºया असे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. सध्या मध्य आणि पश्चिम लोकलमधून साधारण १ लाख २५ हजार कर्मचारी प्रवास करू शकतील. एका लोकलमध्ये साधारण १ हजार २०० जण बसतात. मात्र फिजिकल डिस्टन्सिंग नियमामुळे रेल्वे प्रशासनाने ७०० कर्मचाºयांना प्रवास करण्याचे नियोजन केले आहे.मध्य रेल्वे प्रशासन कोरोनाबाबत जनजागृतीसह स्वच्छता करण्यात आघाडीवर आहे. लोकल, श्रमिक विशेष ट्रेन यांची स्वच्छता करण्यासाठी जंतुनाशक औषधांचा वापर केला जात आहे. बाहेरून आणि आतून लोकलवर सॅनिटायझरचा फवारा मारला जातो. त्यानंतर ही लोकल दुसºया फेरीसाठी वापरली जाते. पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल दिवसातून दोनदा सॅनिटाइझ केली जाते.>लॉकडाऊन काळात रेल्वे प्रशासनाने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली. घाट भागात दरड कोसळू नये, यासाठी लोखंडी जाळ्या लावणे, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करणे, विद्युत दिवे दुरुस्त करणे अशी कामे केली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वेरुळावर पाणी साचण्याच्या ठिकाणी पंप बसविले. कुर्ला कारशेड, वडाळा, टिळकनगर येथे कॅनाल यांची रुंदी वाढविली आहे. ग्रँट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागात मागील वर्षी जास्त प्रमाणात पाणी साचले होते. रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष ठेवून येथे मान्सूनपूर्व कामे केली.>एका फेरीमागे अनेक हातलोकल व्यवस्थित चालविण्याच्या कामासाठी अनेकांचे हात मागे असतात. केवळ मोटरमन आणि गार्डच्या मदतीने लोकल सुरळीत धावू शकत नाही. लोकल चालविण्यासाठी रेल्वेरूळ, ओव्हरहेड वायर यांची दुरुस्ती आणि देखभाल करणे आवश्यक आहे. यासाठी अनेक रेल्वे कर्मचारी चोवीस तास काम करत असतात. कारशेडमध्ये लोकल स्वच्छ धुणे, प्रत्येक डब्याची जोडणी योग्य झालेली आहे ना, याची पाहणी केली जाते. काही त्रुटी असल्यास त्या दूर करणे. लोकलची देखरेख करण्यासाठी कामगार काम करत असतात.