Join us  

CoronaVirus News: गोरेगाव, वांद्रे प., अंधेरी, चेंबूर कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 2:28 AM

बाधितांच्या वाढीचा दर १.५४ टक्के, सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक

मुंबई : कोरोनाचा संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णवाढीचा सरासरी दर आता १.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व- पश्चिम आणि चेंबूर असे काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत, तर पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरीवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज वाढत आहे. दररोज सरासरी आठ ते नऊ हजार बाधित रुग्णांची नोंद होत आहे. सुरुवातीला चेंबूर, गोवंडी, वांद्रे या काही विभागांमध्ये रुग्ण वाढ दिसून येत होती. मात्र, आता सर्वच विभागांमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी ९०९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर आता मुंबईत ६२ हजार १८७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन ४४ दिवसांवर आला आहे. गोरेगाव विभागात हेच प्रमाण ३३ दिवस, वांद्रे पश्चिम येथे ३४ दिवस, अंधेरी पूर्व- जोगेश्वरी येथे ३७ दिवसांमध्ये, चेंबूर- गोवंडी विभागात ३७ दिवस आणि अंधेरी प. येथे ३८ दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. दररोज सुमारे ४२ ते ४५ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. पाचहून अधिक बाधित रुग्ण आढळल्यावरसंपूर्ण इमारत सील करण्यात येते. सीलकरण्यात आलेल्या सर्वाधिक १६७ इमारतीअंधेरी पश्चिम या विभागात आहेत. त्यापाठोपाठपरळ विभागात ८३, ग्रँट रोड- मलबार हिलयेथे ७९, चेंबूर - गोवंडी परिसरात ५९इमारती सील आहेत.या विभागात सर्वाधिक वाढविभाग    दैनंदिन रुग्ण वाढपी दक्षिण -­ गोरेगाव     २.१४एच पश्चिम - वांद्रे पश्चिम    २.०९के पूर्व - अंधेरी, जोगेश्वरी    १.९०एम पश्चिम - चेंबूर    १.९०के पश्चिम - अंधेरी    १.८२एफ उत्तर - माटुंगा-सायन    १.७९पी उत्तर - मालाड    १.६४आर दक्षिण - कांदिवली     १.६४सर्वाधिक सक्रिय रुग्ण के पश्चिम - अंधेरी प.    ४८४९के पूर्व - अंधेरी पूर्व, जोगेश्वरी    ४१७१आर मध्य    ३५४९आर दक्षिण    ३४८४पी उत्तर    ३४२३

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या