Join us  

CoronaVirus News: मुंबईत सोमवारपासून शाळेची घंटा; ठाण्यातल्या शाळाही सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 7:07 AM

पुण्यातल्या शाळांबद्दल पालकमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा अखेर २४ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. तथापि, शाळा सुरू करण्यासंदर्भातील अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्याने सोमवारी एकाच दिवशी राज्यभरातील शाळा सुरू होणार नाहीत, असे चित्र आहे. कोरोनामुळे शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता तो मागे घेत शाळा सुरू करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. स्थानिक प्रशासनास अधिकार दिल्याने एकाच दिवशी सुरू होणार नाहीत शाळापुणे, औरंगाबादमध्ये करावी लागणार प्रतीक्षापुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, शाळा सुरू करण्याची तारीख पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच्या बैठकीत ठरविली जाईल. शाळा लगेच सुरू करण्याबाबत आम्ही द्विधा मन:स्थितीत आहोत. स्थानिक डॉक्टर, पालक संघटनांशीही चर्चा केली जाईल. औरंगाबाद महापालिकेने सोमवारपासून पुढील सात दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालक संघटना, शिक्षणतज्ज्ञांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर शिक्षणमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला व त्यास मान्यता दिली गेली. ऑनलाइन, ऑफलाइन, असे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. १५ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची व्यवस्था महाविद्यालय, शाळांमध्येच करावी, अशी मागणी आमच्या विभागाने आरोग्य विभागाकडे केली आहे. निवासी शाळा किंवा वसतिगृहांमध्ये गेल्या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. त्या शाळा सुरू करण्यासंदर्भात येणाऱ्या काळात निर्णय घेण्यात येणार.पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अनुमती दिली जाईल, तसेच महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आदी स्थानिक प्रशासन परिस्थिती बघून निर्णय घेतील.- वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षणमंत्री

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या