Join us  

CoronaVirus News : "मुलांचे शैक्षणिक शुल्क, कर्जावरील व्याज माफ करावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 5:22 AM

प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, सलून साडेतीन महिने बंद असल्याने सलून कामगार अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.

मुंबई : सलून साडेतीन महिने बंद असल्याने सलून कामगार अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे सलून कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क तसेच कर्जावरील व्याज माफ करावे, अशी मागणी सलून अ‍ॅण्ड ब्यूटीपार्लर असोसिएशनने मंगळवारच्या बैठकीत केली.सलून ब्युटीपार्लर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, सरचिटणीस किसनराव कोरहाळे, उपाध्यक्ष तुषार चव्हाण, चिटणीस प्रकाश चव्हाण आदी मान्यवर असोसिएशनच्या बैठकीला उपस्थित होते. प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, सलून साडेतीन महिने बंद असल्याने सलून कामगार अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांच्यावर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. सलून कामगारांच्या मुलांची शैक्षणिक फी तसेच बँकांचे हप्ते थकले आहेत. बँकेने हप्ते घ्यावेत पण हप्त्यांवरील व्याज माफ करावे, वीजबिल माफ करावे अशी आमची मागणी आहे. याबाबत राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर तावडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक करून सलून कामगारांचे प्रश्न मांडू तसेच लवकरात लवकर सलून चालू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन तावडे यांनी दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.मुलाच्या वाढदिवसाला पैसे नसल्याने सलून चालकाची आत्महत्यासलून तीन महिने बंद असल्याने सलून चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात अनेक जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव नरसाळा येथील रामदास कडूकार यांच्याकडे मुलाच्या वाढदिवसाला पैसे नसल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. राज्यात एकूण सहा आत्महत्येचे प्रयत्न झाले असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या