Join us  

CoronaVirus News: कोरोनापासून बचावासाठी बिग बी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 2:06 AM

लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सिनेकलाकार, साहित्यिक, कलावंत पालिकेला सहकार्य करीत आहेत.

मुंबई : गेले सहा महिने मुंबईकर कोरोनारूपी संकटाचा सामना करीत आहेत. मात्र गेल्या महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला आहे. अनेक ठिकाणी नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सिनेकलाकार, साहित्यिक, कलावंत पालिकेला सहकार्य करीत आहेत. यामध्ये आता सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हेदेखील सहभागी झाले आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेले लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्याचवेळी कोरोना विषाणूचा धोका अद्याप संपलेला नसल्याने मुंबईकरांना आपल्या दैनंदिन जीवनात नवीन बदलांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. विशेषत: मास्कचा वापर नियमितपणे व योग्यरीत्या करणे, हातांची स्वच्छता राखणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब अत्यावश्यक आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मास्कचा वापर कमी झाला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून मुंबईत सुरू करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जनजागृती केली जात आहे. यासाठी सर्वसामान्यांचे आदर्श असलेल्या सिनेकलाकार, कलावंतांचे सहकार्य महापालिका घेत आहे.अभिनेता अनिल कपूर, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, संजय मोने, कवी अशोक नायगावकर यांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमिताभ बच्चन