Join us  

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात 4268 कोरोनाबाधितांची नोंद; रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर

By मुकेश चव्हाण | Published: December 11, 2020 9:27 PM

राज्यात आतापर्यंत  48 हजार 315 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 4,268 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 87 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 73315 पर्यत खाली आला आहे. तसेच आज 2,774 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्यात आतापर्यंत  48 हजार 315 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 17,49,973 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर पोहचला आहे. 

राज्याची राजधानी मुंबईत आज 654 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 311 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दरम्यान, दिवाळीनंतर राज्यासह मुंबईत कोरोनाचा धोका वाढेल, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र समाधानकारक बाब म्हणजे, तज्ज्ञांनी वर्तविलेल्या निरीक्षणानुसार राज्यासह मुंबईची रुग्णसंख्या व मृत्यूच्या प्रमाणात तितकीशी वाढ झाली नसल्याचे समोर आले. आता टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबरअखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु, राज्यातील तापमानात घट झाल्यास शिवाय प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यापूर्वी मे, जून आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढली होती.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई