Join us  

CoronaVirus Nees ; उपचारांसह मानसिक समुपदेशनही , ८०० रुग्ण कोविडमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 6:26 AM

सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करताना त्यांचे समुपदेशनही केले जात आहेत.

मुंबई : कोरोना झाला की त्याच्या शारीरिक त्रासासह प्रचंड मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे कोरोना रुग्णांना धीर देणेही तितकेच महत्त्वाचे असते. सेंट जॉर्ज रुग्णालयातही या रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी डॉक्टर विविध प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे उपचारांमध्येही सकारात्मकता येऊन बरे होण्यास गती मिळते, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत बाराशेहून अधिक रुग्ण या रुग्णालयात दाखल झाले असून ८०० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करताना त्यांचे समुपदेशनही केले जात आहेत. रुग्णांचा मानसिक ताण कमी व्हावा यासाठी रुग्णालयात दोन प्रकारच्या उपचार पद्धती अवलंबिल्या जात आहेत. रुग्णांच्या प्रश्नांचे निराकारण करत कोरोनाविषयी जनजागृती करुन डॉक्टर रुग्णांच्या मनात विश्वास निर्माण करत आहेत.सेंट जॉर्ज कोविड रुग्णालय असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून जे.जे. रुग्णालयातील बारा मानसोपचार तज्ज्ञ दररोज दोन वेळेस या रुग्णांना समुपदेशनाचे धडे देत आहेत. तब्बल ६ ते ८ तास पीपीई कीट्स घालून काम करणारे हे डॉक्टर्स या परिस्थितीतही रुग्णांचे मनोधैर्य वाढवत आहेत.या उपक्रमामुळे डॉक्टर्स रुग्णांना होणार त्रास जाणून घेण्यात यशस्वी झाले असून रुग्णही आता समस्या डॉक्टरापर्यंत पोहोचवतात आणि मार्गदर्शन घेतात.डिस्चार्जनंतर कसे राहावे याचेही मार्गदर्शनरुग्णांना भीतीतून बाहेर पडण्यासाठी म्हणून संगीत, चित्रपट, खेळ याचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी, वॉर्डमध्ये टीव्हीसुद्धा बसवण्यात आले आहेत. रुग्णांना कोरोनाचा त्रास कमी असून मनातील भीतीचे प्रमाण वाढत आहे.२७ मार्चपासून आतापर्यंत सेंट जॉर्ज रुग्णालयात एकूण १ हजार २३५ रुग्णांवर उपचार केले गेले. सध्या १९० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून ८०० रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. विशेष म्हणजे उपचारांदरम्यान आणि त्यानंतरही कसे राहावे याविषयी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस