Join us  

CoronaVirus Lockdown News: कारवाईच्या धसक्याने मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूक २० टक्क्यांनी झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 2:00 AM

 मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी झालेली पहायला मिळाली.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर निर्बंधाची  अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून  करण्यात येणार होती पण सकाळपासून रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. नेहमीच्या तुलनेत रस्त्यावरील २० टक्के वाहनांमध्ये घट झाली असे वाहतूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी झालेली पहायला मिळाली. सध्या रस्त्यावर जी वाहनांची गर्दी होते. त्याच्या तुलनेत २० टक्के वाहने कमी होती अशी माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिली. कठोर नियमावलीमुळे अनेकजण घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत होता. दादर, वरळी,एलबीएस मार्ग,ईस्टर्न एक्स्प्रेस वे , वेस्टर्न एक्स्प्रेस वे, फ्री वे ,लालबाग उड्डाणपूल, बीकेसी  या भागात वाहनांची वर्दळ कमी झाली आहे.मुंबईत कामावर येणाऱ्यांची संख्या कमीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारपासून कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सोमवारी दररोजच्या तुलनेत वाहनांची गर्दी कमी झाली आहे. मुंबईत कामासाठी येणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.रिक्षाच्या २५ तर  टॅक्सीच्या ४० टक्के प्रवाशांमध्ये घटरिक्षाने २ तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. रिक्षाचे प्रवासी  २५ आणि टॅक्सीचे ४० टक्क्यांनी कमी झाले असे स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियनचे  अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या