Join us

coronavirus: लालकृष्ण अडवाणींच्या सारथीच्या मदतीला धावले जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 07:03 IST

मखानी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या फुफुसांना इन्फेक्शन झाले आहे. ४ जुलैला त्यांना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र, प्रयत्न करूनही बेड मिळाला नसल्याने त्यांना रुग्णालयामध्ये खुर्चीवर आॅक्सिजन सिलिंडर हातात धरून बसून राहावे लागले होते.

ठाणे : लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेतील त्यांच्या रथाचे सारथी सलीम मखानी यांच्या मदतीला राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड धावून आले आहेत. त्यांनीच त्यांना वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे.मखानी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या फुफुसांना इन्फेक्शन झाले आहे. ४ जुलैला त्यांना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र, प्रयत्न करूनही बेड मिळाला नसल्याने त्यांना रुग्णालयामध्ये खुर्चीवर आॅक्सिजन सिलिंडर हातात धरून बसून राहावे लागले.याबाबतची माहिती आव्हाड यांना रात्री मिळाली. त्यांनी तातडीने बेड मिळवून दिला. मखानी आता भायखळा येथील मदिना रुग्णालयात आहेत. आता थोडा आराम मिळाला असल्याचे सांगितले आहे.