Join us  

CoronaVirus: सायन रुग्णालयात २७० कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 1:23 AM

आतापर्यंत जन्म घेतलेली सर्व बालके ही कोरोना निगेटिव्ह आहेत.

मुंबई : सायन रुग्णालयात गेल्या २३ मार्चपासून आतापर्यंत २७० कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांची प्रसूती करण्यात आली. यापैकी २५१ मातांची यशस्वी प्रसूती झाली असून त्यांनी एकूण २५२ कोरोना निगेटिव्ह बाळांना जन्म दिला आहे. यातील ११ बालके पहिल्या चाचणीला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. काही दिवसांनंतर दुसरी चाचणी केल्यानंतर त्यादेखील बालकांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे, आतापर्यंत जन्म घेतलेली सर्व बालके ही कोरोना निगेटिव्ह आहेत.आई कोरोना पॉझिटिव्ह असली तरी जन्माला येणारे बाळ कोरोनाबाधित नाही. सर्वसामान्यपणे ज्या गरोदर स्त्रियांना कोरोनाने ग्रासले आहे त्यांची जन्माला येणारी बाळे मात्र कोरोनाबाधित नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे. बाळाला हाताळण्याच्या पद्धतीमुळे बाळाला जन्मानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. २३ मार्चपासून ते आतापर्यंत सायन रुग्णालयात ज्या कोरोनाबाधित गरोदर स्त्रियांची प्रसूती झाली. कोरोनाबाधित मातांच्या एकूण २५२ यशस्वी प्रसूती झाल्या आहेत. यांपैकी, सर्व नवजात बालके कोरोना निगेटिव्ह आढळली आहेत. ११ बालके कोरोना पॉझिटिव्ह होती. मात्र तीही काही दिवसांनी निगेटिव्ह आल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. अरुण नायक यांच्या नेतृत्वाखाली या प्रसूती करण्यात आल्या.।२१ जूनपर्यंत २७० कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. या प्रसूतीपैकी १४१ सिझेरियन आणि १०९ नैसर्गिकरीत्या प्रसूती करण्यात आली आहे. तर, एक चिमट्याने केलेली प्रसूती आहे. त्यामुळे, २५१ मातांची यशस्वी प्रसूती झाली, ज्यात २५२ निगेटिव्ह बाळांचा जन्म झाला आहे. यात एका जुळ्याचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त १२ गर्भपात आणि ५ एकटॉपिक म्हणजेच गर्भधारणा गर्भ पिशवीत न राहता बाजूच्या एका नळीत होते. गर्भपाताचाच हा एक प्रकार असतो. यापैकी फक्त ११ बाळे पॉझिटिव्ह आली होती. मात्र, दुसऱ्या चाचणीनंतर सर्व बाळांची चाचणी निगेटिव्ह आली. सर्व माता आणि बालकांची प्रकृती चांगली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या