Join us  

Coronavirus : मुख्य बाजारपेठा एक दिवसाआड बंद, व्यापारी संघटनांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 7:58 AM

त्यानुसार दादर, झवेरी बाजार यांसारख्या गजबजलेल्या बाजारपेठा गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट, बोरा बाजार, चर्चगेट, कुलाबा, गेट वे आॅफ इंडिया परिसरातील दुकानेही एकदिवसाआड बंद राहतील.

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खासगी कार्यालयापाठोपाठ आता मुंबईतील ५० टक्के दुकाने एकदिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकार आणि महापालिकेने घेतला आहे. काही ठिकाणी व्यापारी संघटनांनी पुढाकार घेत दुकाने बंद ठेवण्याची तयारी दाखवली आहे. त्यानुसार दादर, झवेरी बाजार यांसारख्या गजबजलेल्या बाजारपेठा गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट, बोरा बाजार, चर्चगेट, कुलाबा, गेट वे आॅफ इंडिया परिसरातील दुकानेही एकदिवसाआड बंद राहतील.सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील दुकाने एकदिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी सरकारने घेतला. मुंबईतील २४ विभागातील सहायक आयुक्तांना परिसरातील दुकानांचा आढावा घेऊन कोणती दुकाने कधी बंद राहतील याचे नियोजन करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले होते. त्यानुसार, कुलाबा, चर्चगेट, मलबार हिल, दादर, माहीम, लोअर, परळ, वांद्रे, मालाड येथील मुख्य बाजारपेठ, दुकाने एकदिवसाआड सुरू राहतील. पुढच्या आठवड्यात २५ मार्चला गुढीपाडवा असल्याने दादरमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. श्री दादर इमिटेशन अँड कटलरी वेल्फेअर असोसिएशननेही डिसिल्वा मार्गावरील ८० दुकाने मंगळवारपर्यंत बंद ठेवण्याची तयारी दाखवली आहे.एक दिवसाआड अशा प्रकारे राहणार बंददादरएन. सी. केळकर मार्ग (पूर्व)डीसिल्वा रोडछबिलदास रोडएस. के. बोले मार्ग (दक्षिण)सेनापती बापट मार्ग (कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूूटपासून हॉकर्स प्लाझापर्यंत)माहिमटी. एच. कटारिया रोड (दक्षिण-गंगा विहार हॉटेलपासून शोभा हॉटेलपर्यंत)एल. जे. क्रॉस रोड (दर्गा गल्ली)धारावी९० फूट रोड (पश्चिम बाजू) आणि ६० फुटी रोड ते संत रोहिदास रोडआंध्र व्हॅली रोड (पश्चिम बाजू)एम. जी. रोड (पश्चिम बाजू)दादरएन. सी. केळकर मार्ग (पश्चिम बाजू)एम. सी. जवळे रोड, भवानी शंकर म्युनिसिपल शाळेपर्यंतएम. जी. रानडे रोडएस. के. बोले मार्ग (उत्तर बाजू)सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवारग्रँड रोड : डॉ. डी बी मार्ग, अली भाई प्रेमजी मार्ग, पंडिता रमाबाई मार्ग, हरिश्चंद्र गोरेगावकर मार्ग, चर्नी रोड गिरगाव : एस एस मार्ग, खेतवाडी मेन रोड, मुंबई सेंट्रल, ताडदेव : जहांगिर बोमान बेहरम रोड, बेलासिस मार्ग, सीताराम घाडीगावकर मार्ग, मलबार हिल, महालक्ष्मी : नेपियन्सी रोड, बी. जी. खेर मार्ग, क्रांती मार्गमंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवारग्रँट रोड : नौशिर भरूचा मार्ग, पट्टे बापूराव मार्ग, गावदेवी रोड, के मुंशी मार्ग, आत्माराम रांगणेकर मार्ग, चर्नी रोड गिरगाव : पुरंदरे मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, बीपी रोड, राजा राम मोहन रॉय रोड, मुंबई सेंट्रल ताडदेव : निमकर मार्ग, एम. एम. मालवीय मार्ग, साने गुरुजी मार्ग, राठोड मार्ग, महालक्ष्मी : वाळकेश्वर रोड, पाटकर मार्ग, पेडर रोड, भुलाबाई देसाई रोडमंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवारअब्दुल रहमान स्ट्रीट, मोहम्मद अली रोड, नरसी नाथा स्ट्रीट, संत तुकाराम मार्ग, पी डिमेलो रोड, युसुफ मेहेरली रोड, इब्राहिम मोहम्मद मर्चंट रोड, पायधुनी पोलीस स्टेशन जंक्शन, जेजे हॉस्पिटल जंक्शन, मोहम्मद अली रोड जंक्शन, कर्नाक बंदर जंक्शन.या मुख्य बाजारपेठा, दुकाने बंद फोर्ट, चर्चगेट, कुलाबासोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवारी बंद राहणारी दुकानेफोर्ट : वीर नरिमन रोड, एमजी रोड, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते हॉर्निमन सर्कल, मनीष मार्केट, मुसाफिरखाना, लोकमान्य टिळक मार्ग, आनंदीलाल पोद्दार मार्ग, चर्चगेट स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भुयारी मार्ग, कुलाबा : कफ परेड - सोमानी मार्ग, नाथलाल पारेख मार्गमंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवारफोर्टमध्ये वालचंद हिराचंद मार्ग, डॉ. डी. एन. रोड ते हुतात्मा चौक, नरिमन रोड, शहीद भगतसिंग मार्ग, बोरा बाजार, नरिमन पॉइंट, नेताजी सुभाष रोड, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट भुयारी मार्ग, कुलाबा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग (गेटवे आॅफ इंडिया), शहीद भगत सिंह मार्ग ते पांडे चौक.वांद्रे, खार, सांताक्रुझसोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवारवांद्रे : पाली थोड, हिल रोड, खार : केएफसी जंक्शन ते शिर्डी मार्ग सांताक्रुज टिळक रोड महात्मा गांधी रोड सांताक्रुज स्थानक रोडमंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवारबांद्रा स्टेशन ते साधू वासवानी गार्डन, नारायण दायाबाई रोड, बाजार रोड, सखाराम बुवा पाटील मार्ग विठ्ठलदास पटेल रोड लिंकिंग रोड सांताक्रुज स्थानक रोड ते एस. वी. रोडसोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवारमाटुंगा येथील भंडारकर मार्ग, तेलंग मार्ग, एल एन रोड (उत्तर दिशा) ईडन वाला रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड (उत्तर दिशा), वडाळा : आर. के. किडवाई रोड (उत्तर दिशा) भैरवनाथ मंदिर रोड, सायन स्थानक रोड, रोड नंबर ८ सायन, रोड नंबर 31 सायन फ्लंक रोड, एम. जी. आर. चौक ते आंबेडकर नगर, लक्ष्मीबाई केळकर मार्ग, सुंदर विहार रोड प्रतीक्षा नगर, माला गार्डन एरिया प्रतीक्षा नगर, अँटॉप हिल : शेख मिस्री रोड, मुकुंदराव आंबेडकर रोड, जे. के भसीन मार्ग.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई