Join us  

Coronavirus: पश्चिम रेल्वे मार्गावरून धावणार एसी लोकल; गर्दी टाळण्यासाठी फेऱ्याही वाढवल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 3:07 AM

दोन धिम्या फेऱ्या डाऊन मार्गावर महालक्ष्मी ते बोरिवली आणि अप मार्गावर बोरिवली ते चर्चगेट अशा होतील. ८ फेऱ्या डाऊन मार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान आणि ४ फेऱ्या अप मार्गावर विरार ते चर्चगेट दरम्यान चालविण्यात येतील.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपनगरी रेल्वे सेवा बंद आहे. परंतु सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर ५०६ लोकल फेऱ्या रोज चालवण्यात येत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी गुरुवार, १५ ऑक्टोबरपासून आणखी १९४ फेऱ्य़ा चालवण्यात येतील. त्यामुळे आता रोज ७०० फेऱ्या होतील. यामध्ये १० एसी लोकल फेऱ्यांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर म्हणाले की, पश्चिम रेल्वेकडून १५ ऑक्टोबरपासून रोज चालविण्यात येणाऱ्या १९४ अतिरिक्त फेऱ्यांमध्ये सकाळी गर्दीच्या वेळी ४९ आणि सायंकाळी गर्दीच्या ४९ फेऱ्या धावतील. या १९४ फेऱ्यांमध्ये १० वातानुकूलित फेऱ्यांचा समावेश आहे. दोन धिम्या फेऱ्या डाऊन मार्गावर महालक्ष्मी ते बोरिवली आणि अप मार्गावर बोरिवली ते चर्चगेट अशा होतील. ८ फेऱ्या डाऊन मार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान आणि ४ फेऱ्या अप मार्गावर विरार ते चर्चगेट दरम्यान चालविण्यात येतील.

एकूण १९४ फेºयांमध्ये चर्चगेट ते विरार दरम्यान ५१ फेºया, तर बोरिवली ते चर्चगेट दरम्यान ९६ फेºया वाढविण्यात आल्या आहेत. याचप्रकारे भार्इंदर ते विरार ९ फेºयांची, नालासोपारा ते चर्चगेट १२, चर्चगेट ते भार्इंदर ९, वसई रोड ते चर्चगेट २, वांद्रे ते बोरिवली ८ आणि चर्चगेट ते वांद्रेदरम्यान ८ फेºयांची वाढ करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवरही लवकरच ७०० फेºया मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ४२३ फेºया होत होत्या. १० ऑक्टोबरपासून त्यामध्ये आणखी २२ फेºयांची वाढ करण्यात आली असून सध्या एकूण ४५३ फेºया चालविण्यात येत आहेत. गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून मध्य रेल्वेवरही लवकरच ७०० पर्यंत फेºया वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दिव्यांग, कॅन्सरच्या रुग्णांना प्रवासाची मुभादिव्यांग आणि कर्करोग झालेल्या (कॅन्सर) रुग्णांना मध्य रेल्वेने यापूर्वीच प्रवासाची मुभा दिली आहे. त्यानंतर आता मंगळवारी रात्री उशिरा पश्चिम रेल्वे प्रशासनानेही त्यांना विशेष डब्यातून प्रवासास मुभा दिली. त्यानुसार, बुधवारपासून ते पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करू शकतील.

 

टॅग्स :मुंबई लोकलपश्चिम रेल्वे