Join us  

CoronaVirus News: केईएमच्या उपाहारगृहातील २१ कर्मचाऱ्यांना झाला कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 2:13 AM

रुग्णालयातल्या उपाहारगृहामध्ये कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी आढळल्याने रुग्णालयाची चिंता वाढली

मुंबई : परळच्या केईएम रुग्णालयातील उपाहारगृह कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट ठरत आहे. चहा किंवा गरमागरम नाश्ता करण्यासाठी डॉक्टरांसह रुग्णांचे नातेवाईक या कॅन्टिनमध्ये हजेरी लावत असतात. अशातच आता या कॅन्टिनमधील २१ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. परळमध्ये असलेल्या या रुग्णालयात कोविड-१९ च्या शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातच रुग्णालयातल्या उपाहारगृहामध्ये कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी आढळल्याने रुग्णालयाची चिंता वाढली आहे. रुग्णालयातील मध्यवर्ती उपाहारगृहामधील २७ कर्मचाऱ्यांपैकी २१ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अधिकाºयाने सांगितले आहे. त्यानंतर उपाहारगृह पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.याविषयी अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख म्हणाले, सर्व कर्मचारी हायड्रॉक्सी क्लोरोक्विनवर होते, कारण त्यांना सर्वाधिक धोका आहे. बराच विचार केल्यानंतर जवळील सर्व भोजनालये बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांसाठी उपाहारगृह कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही आता उपाहारगृह बंद केले असून उर्वरित लोकांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या आहेत.संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी किमान दोन वृद्ध उपाहारगृह व्यवस्थापकांमध्ये तीव्र लक्षणे आढळली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.केएमईचा निवारक आणि सामाजिक औषध (पीएसएम) विभाग ज्याने काळजीपूर्वक रुग्णालयाच्या आरोग्य सेवेतील कर्मचाºयांमध्ये संसर्गाची नोंद घेतली आहे, त्यांना पहिल्या काही घटनांमुळे सतर्क केले गेले.सध्या, १३५ पेक्षाहून जास्त आरोग्यसेवा कर्मचारी उपचार घेत आहेत. आम्हाला एका रुग्णाकडून अनेक संपर्क सापडले. ती संख्या सध्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याचे वेल्हाळ यांनी सांगितले. अन्य केईएम उपाहारगृहाच्या कर्मचाºयांनी सांगितले की, महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडेन्ट डॉक्टरने नऊ आठवड्यांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि सेनिटायझर्सचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या