Join us

कोरोनाच्या दहा महिन्यांत १२०० रुग्णांना जीवनदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:24 IST

प्लेटलेट्स दाता संजय मोदी यांची माहितीफोटो मस्ट आहे.लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचे तांडव अजूनही सुरू असूनही ...

प्लेटलेट्स दाता संजय मोदी यांची माहिती

फोटो मस्ट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे तांडव अजूनही सुरू असूनही या दहा महिन्यांत ६११ बाटल्या रक्तसंकलन करीत १२०० हून अधिक लोकांना जीवनदान देण्यात आल्याचे प्लेटलेट्स दाते संजय मोदी यांनी सांगितले. रविवारी मागाठाणे परिसरात त्यांनी आयोजित केलेल्या ‘महारक्तदान शिबिरा’दरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

विकासक तसेच प्लेटलेट्स दाते संजय मोदी यांनी रविवारी मागाठाणे विधानसभा व टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालय यांच्या सहकार्याने कांदिवली पूर्वच्या महापालिका शाळेत ‘महारक्तदान शिबिरा’चे आयोजन केले होते. शिबिराच्या माध्यमातून त्यांनी १५४ बाटल्या रक्त संकलन करीत रक्तदात्यांना ‘भगवतगीता’ भेट म्हणून दिली. कोरोनाचे भान ठेवत मास्क, सॅनिटायझेशन तसेच सोशल डिस्टन्सचे सर्व नियम काटेकोरपणे या ठिकाणी पाळले गेले. मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत त्यांनी अशा ६ शिबिरांचे आयोजन केले. त्यामुळे १२०० रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. कोरोना काळात घाबरून घरात बसून न राहता रक्तदानासाठी ते सतत हजारो लोकांना प्रोत्साहित करीत आहेत. रविवारचा कार्यक्रम यशस्वी केल्याबाबत हेरिटेज फॅमिलीचे अरुण केजरीवाल, टीम हेलपिंग हॅन्डस तर याआधी आयोजित कॅम्पमध्ये मदतीचा हात पुढे करणारे मालाडचे स्वामी नारायण मंदिर, कांदिवलीतील जैन उपाश्रय यांचेही त्यांनी आभार मानले.