Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रोझ डे'ला कोरोनाचा फटका, गुलाब खरेदीला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:05 IST

मुंबई : रविवारी रोझ डे पासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली. दरवर्षी संपूर्ण व्हॅलेंटाइन वीकमध्ये मुंबईतील फूल बाजारांमध्ये गुलाबांची विक्री ...

मुंबई : रविवारी रोझ डे पासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली. दरवर्षी संपूर्ण व्हॅलेंटाइन वीकमध्ये मुंबईतील फूल बाजारांमध्ये गुलाबांची विक्री तेजीत असते. यंदा कोरोनामुळे फूल बाजारांमधील गुलाब विक्रीला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

दरवर्षी विविध प्रकारच्या रंगछटा असणाऱ्या गुलाबांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. कोरोनामुळे कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. गुलाब विक्रीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भारतातील गुलाबांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, अजूनही अनेक देशांमध्ये लॉकडाऊन कायम असल्याने गुलाबाची परदेशी निर्यात मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. यंदा फूल उत्पादकांनी गुलाबाची लागवड कमी केली. इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक खर्चदेखील वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबाचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबईतील दादर फूल बाजारात गुलाब खरेदीला नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले. दरवर्षी रोझ डे पासून व्हॅलेंटाइन वीकच्या सर्व कार्यक्रमांना गुलाबांची मागणी जास्त असते. गुलाबांची मागणी घटल्याने गुलाब विक्रीवर परिणाम झाला असल्याचे फूल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तरीदेखील व्हॅलेंटाइन डे पर्यंत गुलाब विक्री चांगली होण्याची फूल विक्रेत्यांना आशा आहे.