Join us  

Corona Virus : ‘धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका जास्त असल्याचे उत्पादकांनी नाकारले!’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 7:57 AM

Corona Virus : धूम्रपानामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका जास्त असल्यास धूम्रपानावर तात्पुरती बंदी टाकण्याचा विचार करा, असे गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुचवले होते.

मुंबई : धूम्रपानामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका जास्त असल्याचे सिगारेट उत्पादकांनी नाकारले आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.धूम्रपानामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका जास्त असल्यास धूम्रपानावर तात्पुरती बंदी टाकण्याचा विचार करा, असे गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुचवले होते. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याची सरकारला गुरुवारी आठवण करून दिली. धूम्रपानामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो आणि कोरोना फुफ्फुसांवर हल्ला करतो, हे आम्हाला माहीत आहे.त्यावर महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की, सिगारेट उत्पादकांनी पाठविलेल्या प्रतिक्रिया आणि अन्य भागदारांचे मत विचारात घेऊन सरकार निष्कर्ष काढेल.उत्पादकांकडून प्रतिसादांचा पूर आला आहे. त्यांनी धूम्रपानामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका जास्त असल्याचे नाकारले आहे, असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या