Join us  

Corona Virus: दिलासादायक ! राज्यात कोरोना नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 7:55 AM

Corona Virus: राज्यात मंगळवारी १२० कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,३४,६२७ झाली आहे. सोमवारी १६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८५,३०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

मुंबई : राज्यात मंगळवारी १२० कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,३४,६२७ झाली आहे. सोमवारी १६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८५,३०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात मंगळवारी ९१८ सक्रिय रुग्ण आहेत, परिणामी आता राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५४,५९,३२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ०९.५२  टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दोन आठवड्यांत कोविड रुग्णसंख्या १,६५९ वरून १,०३७ पर्यंत कमी झाली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात २७ रुग्ण आढळले. मुंबईत एकूण ११,५३,७८० रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९ हजार ७४२ एवढी झाली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या