गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमात प्रादुर्भाव पसरताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे नियम पाळणं आणि लसीकरण यावर भर देण्यात येत आहे. शनिवारी महाराष्ट्रात जवळपास ५० हजार तर मुंबईत ९ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. या सर्व बाबी लक्षात घेता आता सरकारनं लसीकरणाची मोहीम जलद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज मुंबईत लसीकरण केंद्रे सुरू राहतील. तसंच ४५ वर्षांवरील व्यक्ती लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेऊ शकतील. मुंबई महानगर पालिकेनं (BMC) ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. "या रविवारी, चला विषाणूला खाली आणूया. शहरात लसीकरण मोहीमेला गती देण्यासाठी आज शहरातील सर्व लसीकरण केंद्रे खुली राहणार आहेत. जर तुमचं वय ४५ पेक्षा अधिक असेल तर पॅन, आधार किंवा कोणत्याही फोटो आयडीसह लसीकरण केंद्रावर या आणि लस घ्या," असं ट्वीट मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.
Corona Vaccination : मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली; आजही लसीकरण केंद्रे सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 08:26 IST
लसीकरण केंद्रे खुली ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींना ओळखपत्र घेऊन जाता येणार.
Corona Vaccination : मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली; आजही लसीकरण केंद्रे सुरू राहणार
ठळक मुद्देलसीकरण केंद्रे खुली ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे.४५ वर्षांवरील व्यक्तींना ओळखपत्र घेऊन जाता येणार.