Join us

आरोपीच कोरोनाबाधित निघाल्यानं पोलिसांची कोरोना चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 05:23 IST

तपास करणा-या २० ते २५ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीची मागणी केली असून काहींची चाचणी केली आहे.

मुंबई : एका घरात घुसून चोरीसह हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगाराला रंगेहाथ अटक करण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या कोठडीनंतर आरोपी कोरोनाबाधित निघाला. बांगुरनगर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. आता याप्रकरणी तपास करणा-या २० ते २५ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीची मागणी केली असून काहींची चाचणी केली आहे.अटक आरोपी हा गोरेगाव येथील भगतसिंग झोपडपट्टीतील रहिवाशी असून, २० एप्रिलला बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात घुसून चोरीसह, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दोन दिवसानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानुसार पोलीस कर्मचाºयांनी त्याला तळोजा कारागृहात नेले. मात्र कोरोना चाचणीशिवाय आत घेणार नसल्याचे सांगत कारागृह विभागाने त्यांना माघारी पाठवले. संबंधित आरोपीला पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दिवस पाळीवरील कर्मचारी घरी निघून गेल्यानंतर रात्रपाळीवरील कर्मचाºयांनी त्याला पुन्हा दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करत घडलेला घटनाक्रम सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने आरोपीला जे. जे. रुग्णालयात दाखल करून त्याची कोरोना चाचणी करण्यास सांगितले. पुढे अहवालातून त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.याबाबत रुग्णालयाकडून तळोजा कारागृहाला कळविण्यात आले. तेथून ही बाब बांगुरनगर पोलीस ठाण्याला समजताच त्यांना धक्का बसला आहे.>चाचणी महत्त्वाचीचकुठल्याही आरोपीला कारागृहात घेण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी होणे गरजेचे आहे. कोरोनाची एकामुळे अन्य कैद्यांना लागण होवू नये म्हणून कोरोना चाचणी महत्त्वाची असल्याचे तळोजा कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या