मुंबई : कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबूकद्वारे संवाद साधताना दिलीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीस दल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. पोलीसांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावरदेखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा कोरोना कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील. अशी माहिती त्यांनी दिली.
पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष - गृहमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 04:36 IST